शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग

शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 20, 2024 11:36 AM IST

शुक्रवारी वटपौर्णिमा हा सण आहे. हा सण महाराष्ट्रातील महिला मोठ्या आनंदाने साजरा करतात. त्यानिमित्ताने मालिकांमध्ये देखील हा सण साजरा केला जात आहे.

vat purnima 2024 special: झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग
vat purnima 2024 special: झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये वटपौर्णिमा हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. या सणाला महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी, वडाच्या झाडाची पूजा करून आणि उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आता हा सण छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये देखील साजरा केला जातो. या सणाला कोणत्या मालिकेत काय घडणार चला जाणून घेऊया...

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग पार पडणार आहे. त्यामध्ये तुला शिकवीन चांगलाच धडा', 'नवरी मिळे हिटलरला', 'पारू', 'पुन्हा कर्तव्य आहे' आणि 'शिवा' या मालिकांचा समावेश आहे. या मालिकांच्या भागांमध्ये उद्या काय घडणार चला जाणून घेऊया..
वाचा: 'सोनाक्षी आणि जहीरची मुले होऊ द्या', स्वरा भास्करने दोघांच्या धर्मावरुन मांडले स्पष्ट मत

शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी चारहात

'शिवा' च्या पहिल्या वट सावित्री पूजेसाठी रामभाऊ आणि पूर्ण परिवार पूजेसाठी जातात. शिवा आपल्या पूजेची सुरवात करत असताना काही गुंड आशूच्या बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. आशु त्यांच्याशी दोन हात करायला जातो. पण ह्या हातापायीत आशूवर वार होतो तिकडे शिवा आशूच्या मदतीला येते. वट सावित्रीच्या दिवशी ही सावित्री आपल्या सत्यवानची रक्षा ह्या गुंडांना पासून कशी करणार हे पाहायला मिळणार.
वाचा: शुटिंगदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शकाला दादा कोंडकेंनी खायला घातली होती बटाट्याची भाजी, वाचा किस्सा

वसुंधरा करणार नव्याने सुरुवात

'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये वसुंधरा आपल्या जुन्या नात्यांच्या धाग्यांना तोडून आकाश सोबत एक नवीन विश्व् उभारण्याचा निर्णय घेईल का हे ह्या वटपौर्णिमा विशेष मिळणार आहे. हा मोठा निर्णय घेत असताना वसुंधराचा भूतकाळ तिच्यासमोर येऊन उभा राहणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

पारु नकळत करणार वडाच्या झाडाची पूजा

'पारू' मालिकेत अहिल्यादेवी वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांसाठी जेवण बनवायचे ठरवते तर दुसरीकडे कोणाच्याही नकळत पारू वडाच्या झाडाची पूजा करायचे ठरवते. वटपौर्णिमेच्या दिवशी पारू आदित्यच्या ताटातलं उष्ट जेवण जेवते हे सगळं सावित्री पाहते. पारूचं सत्य सावित्रीसमोर येईल ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
वाचा: दाक्षिणात्य हॉरर सिनेमा 'नमस्ते घोस्ट' घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर पाहाता येणार

अक्षरा आणि अधिपतीमध्ये निर्माण होणार जवळीक

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. दोघेही घर सोडून नवीन संसार सुरु करण्याच्या उंबरठयावर आहेत. अक्षराने, वट सावित्रीचा उपवास धरला आहे, अक्षराला इतके कष्ट घेताना बघून अधिपती देखील पूजेमध्ये तिच्या सोबत आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने या दोघांवर एक विशेष गाणं देखील चित्रित झालं आहे.

वडाला फेऱ्या मारताना लीलाची तब्बेत बिघडली

'नवरी मिळे हिटलरला' मध्ये दुर्गा, कालिंदी समोर जहागीरदार घराण्याच्या एका अश्या प्रथेचा उल्लेख करते ज्या मध्ये जर नव्या नवरीने वडाच्या झाडाला १००१ फेऱ्या मारल्या तर संसार सुखाचा होतो. कालिंदीच्या मनात ती गोष्ट घर करून आहे आणि ती लीला कडून १००१ फेऱ्या मारून घेण्याचा निश्चय करते. फेऱ्या मारताना लीलाची तब्बेत बिघडते आता अभिराम ह्यात लीलाला कशी साथ देतो हे पाहणं रंजक असणार आहे.

Whats_app_banner