Varun Dhawan: बॉलिवूड अभिनेता वरूण धवन सध्या चर्चेत आहे. त्याचा 'बेबी जॉन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अटली आणि कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. या प्रमोशन दरम्यान वरूण धवनने खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे. त्याने त्याच्या आयुष्यात एक घटना अशी घडली की जवळपास दोन वर्षे ब्रेक घ्यावा लागला होता असे देखील सांगितले. या घटनेनंतर वरूण धवनने भगवद्गीता आणि रामायण वाचायला सुरुवात केली होती. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...
वरूणने नुकताच रणवीर अल्लाबादियाच्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या. त्यावेळी त्याने सांगितले की त्याचा ड्रायव्हर मनोज गेल्या 26 वर्षांपासून त्याच्यासोबत होता आणि जेव्हा त्याचे निधन झाले तेव्हा तो पूर्णपणे हादरला होता. त्या घटनेपूर्वी तो खूप वेगळा माणूस होता आणि त्या घटनेनंतर तो पूर्णपणे वेगळा माणूस बनला आहे.
"मला वाटायचे की मी हिरो आहे आणि मी सर्व काही करू शकतो. मी त्या दिवशी अपयशी ठरलो कारण... मी मनोजच्या खूप जवळ होतो. मनोज माझा ड्रायव्हर होता. आम्ही काही काम करत असताना अचानक मनोजचा मृत्यू झाला. मी त्यांना सीपीआर दिला. आम्ही त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्येही घेऊन गेलो होतो. मनोज जिवंत राहील असे आम्हाला वाटले होते, पण तो माझ्या कुशीतच मरण पावला" असे वरूण धवन म्हणाला.
पुढे वरूण म्हणाला, "त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मला वेळ लागला. बघितलं तर मी कामही बंद केलं. दोन वर्षांनंतर माझा एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. 'बेबी जॉन' दोन वर्षांनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या घटनेने मला हादरवून सोडले. माझ्या मनात बरीच वर्षे गेली. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी भगवद्गीता, महाभारत आणि रामायण वाचायला सुरुवात केली. माणूस म्हणून वाढायला हवं हे माझ्या लक्षात आलं. या घटना तुम्हाला हादरवून टाकतात, पण तुम्ही शांत बसू शकत नाही. "
वाचा: वहिदा रहमान यांनी डेब्यू केलेला सिनेमा आठवतोय का? ठरला होता १९५६मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
'बेबी जॉन' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अटली यांनी केले आहे. या चित्रपटात वरूण धवनसोबत कीर्ती सुरेश, सान्या मल्होत्रा, जॅकी श्रॉफ, वामिका गब्बी हे कलाकार दिसणार आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य सुपरहिट सिनेमा थेरीचा रिमेक आहे. हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या