Varun Dhawan Daughter Name: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे आई-बाबा झाले आहेत. जूनमध्ये नताशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर वरुण आपल्या मुलीचे नाव काय ठेवणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता वरुणने एका कार्यक्रमामध्ये मुलीचे नाव काय ठेवले याविषयी माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया वरुण धवनच्या मुलीचे नाव आणि त्याचा अर्थ काय...
वरुण धवनने नुकताच कौन बनेगा करोडपती सिझन १६मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान अभिनेत्याने आपल्या मुलीचे नाव सांगितले आहे. वरुणने या कार्यक्रमात त्याच्या मुलीच्या जन्मानंतर अनेक गोष्टी बदलल्या असल्याचे सांगितले. तसेच तिला झोपताना अंगाई गाण्यासाठी वरुणने काही अंगाई तयार केल्या आहेत. या अंगाई त्याने केबीसीमध्ये गाऊन दाखवल्या. तसेच त्याने मुलीचे नाव लारा ठेवल्याचे देखील सांगितले.
वरुण लवकरच सिटाडेल: हनी बन्नी या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिज्या प्रमोशनसाठी वरुण दिग्दर्शक राज आणि डीकेसह गेम शोच्या एका एपिसोडमध्ये आला होता. दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ यांनी वरुणला आठवण करून दिली की, यंदाची दिवाळी त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी आणखी खास आहे. कारण त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. 'वरुण, ही दिवाळी तुझ्यासाठी खूप खास आहे, कारण तुमच्या घरी लक्ष्मीजींचे आगमन झाले आहे,' असे अमिताभ यांनी म्हटले आहे.
बिग बींना उत्तर देत वरुणने हात जोडून त्याचे आभार मानले. तो म्हणाला, "आम्ही तिचं नाव लारा ठेवलं. मी अजूनही तिच्याशी कनेक्ट व्हायला शिकत आहे." त्यानंतर वरुणने अमिताभ यांच्याकडून पालकत्वाचा सल्ला घेतला आणि त्यांची मुले अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन लहान असताना यांच्यापैकी कोणी रात्रभर जागवलं असा देखील प्रश्न विचारला आहे. यावर अमिताभ म्हणाले, "मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फक्त तुमच्या पत्नीला खुश ठेवा... जर ती आनंदी असेल तर आयुष्यात सर्व काही व्यवस्थित होईल. हे एकच सूत्र आहे - पत्नी सर्वोच्च आहे."
जेव्हा नावाच्या अर्थाचा विचार केला जातो तेव्हा लाराचे विविध संस्कृतींमध्ये अनेक अर्थ आणि उगम आहेत. लॅटिन भाषेत, हा शब्द लारेस या शब्दापासून आला आहे, जो रोमन देवतांना संदर्भित करतो ज्यांनी घरे आणि शेतांचे रक्षण केले. ग्रीक पौराणिक कथांमध्ये, लारा ही देवांची अप्सरा आणि संदेशवाहक होती. स्पॅनिशमध्ये या नावाचा अर्थ "लॉरेल" किंवा "बे ट्री" असा होतो.
वाचा: लसणाच्या पाकळ्या खाऊन 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने काढले दिवस, विनय आपटेंना कळाले अन् बदलले आयुष्य
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर वरुण लवकरच राज अँड डीकेच्या सिटाडेल: हनी बन्नी या चित्रपटात सामंथा रूथ प्रभू, के के मेनन आणि सिकंदर खेर सोबत दिसणार आहे. अमेरिकन सीरिजचे भारतीय रूपांतर ७ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर ही प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या