Varun Dhawan-Natasha Dalal Pregnant: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री नताशा दलाल यांच्या लग्नाला आता बराच काळ लोटला आहे. दोघेही बी-टाऊनचे खूप लोकप्रिय कपल आहेत. गेल्या काही दिवसांपासून वरुण आणि नताशा चाहत्यांना गुडन्यूज देणार अशी चर्चा सुरू होत्या. अखेर आता अभिनेत्याने चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी आपण आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे.
आता अभिनेता वरुण धवन याची नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वरुणचे चाहते ज्या दिवसाची वाट बघत होते, तो दिवस अखेर आला आहे. आता वरुण धवनने नताशा दलालच्या प्रेग्नन्सीची अधिकृत घोषणा केली आहे. आता या जोडप्याच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे. या जोडीने स्वतः सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. गुडन्यूज शेअर करताना वरूण धवनने एक सुंदर मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. या फोटोत नताशाचा बेबी बंपही दिसत आहे. या फोटोमध्ये नताशा दलाल एका साध्या पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.
या फोटोमध्ये वरुण धवन गुडघ्यावर बसून पत्नीच्या बेबी बंपला प्रेमाने किस करताना दिसत आहे. घराच्या खिडकीसमोर काढलेल्या या सुंदर फोटोमध्ये त्यांचा पाळीव कुत्राही पोज देताना दिसत आहे. या फोटोत नताशा हसताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना वरुण धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आम्ही प्रेग्नंट आहोत. तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. माझे कुटुंब ही माझी ताकद आहे.’ आता अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. चाहत्यांपासून ते सोशल मीडिया सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या जोडप्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत. ज्युनियर धवनच्या आगमनाचा आनंद आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
वरुणच्या या पोस्टवर अभिनेत्री मृणाल ठाकूरने कमेंट करत लिहिले, 'ओएमजी अभिनंदन.' भारती सिंहनेही हृदयाचे इमोजी पोस्ट करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. रेमो डिसूझानेही दोघांचे अभिनंदन केले आहे. क्रिती सेनन आणि समंथा रुथ प्रभू यांनीही यावर कमेंट आपले प्रेम व्यक्त केले आहे. जान्हवी कपूर, सोफी चौधरी, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, सोनम कपूर, अवनीत कौर, मनीष पॉल, राशि खन्ना, वाणी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.