अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होत असल्यामुळे चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांना मुलगी झाल्याचे समोर आले आहे. पण तुम्हाला वरुण आणि नताशाची लव्हस्टोरी माहिती आहे का? चला जाणून घेऊया…
वरुण धवनने करीना कपूर खानच्या शोमध्ये पहिल्यांदाच त्याची लव्हस्टोरी सांगितली होती. ११वी पर्यंत शिक्षण घेत असताना दोघांमध्ये चांगली मैत्री होती. एक दिवस नताशाला पाहून वरुणला प्रेमात असल्याचे जाणवले.
वरुण आणि नताशा शाळेत देखील बेस्ट फ्रेंड्स होते. दोघांनी एकत्र शिक्षण घेतले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळाले नाही. शाळेत असतानाच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती.
वरुण धवनने २०२४मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून पदार्पण केले. यावेळी देखील तो नताशासोबत रिलेशनशीपमध्ये होता. कामावर परिणाम होऊ नये म्हणून दोघांनी त्यांचे नाते गुपित ठेवले होते.
वरुण धवनच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये नाताशा आणि वरुणला पहिल्यांदा एकत्र पहिले गेले. नताशाने या पार्टीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर दोघे लंडनमध्ये एकत्र दिसले होते. तेव्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या.