मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Varsha Usgaonkar: १९८८मध्ये वर्षा उसगावकर स्विमिंगसूटमध्ये करणार होत्या शूट, वडिलांना कळताच...

Varsha Usgaonkar: १९८८मध्ये वर्षा उसगावकर स्विमिंगसूटमध्ये करणार होत्या शूट, वडिलांना कळताच...

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 20, 2024 11:57 AM IST

Varsha Usgaonkar talked about South Cinema: वर्षा यांना एकदा कन्नड चित्रपटाची ऑफर आली होती. पण स्विमिंग सूट घालावा लागणार हे कळताच त्या पळून आल्या.

Varsha Usgaonkar
Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar Get Emotional: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे उर्षा उसगांवकर. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. त्यांना एकदा कन्नड चित्रपटाची देखील ऑफर आली होती. पण या चित्रपटात स्विमिंग सूट घालायला लागल्यामुळे वर्षा तेथून पळून आल्या होत्या. याबाबत जेव्हा त्यांच्या वडिलांना कळाले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती हे देखील सांगितले आहे.

वर्षा उसगावकर यांनी नुकताच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटाविषयी वक्तव्य केले. “‘गंमत जंमत’ प्रदर्शित झाल्यावर मला कन्नड चित्रपटसृष्टीतील निर्माते भेटायला आले होते. त्या चित्रपटाचे नाव ‘अर्जुन’ असे होते. त्यावेळी सुपरस्टार अंबरीश यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मला मिळाली होती. ते आता हयात नाही. त्या चित्रपटात ज्या मुलीचे पात्र मी साकारणार होते ती नॉर्थ इंडियन होती” असे वर्षा म्हणाल्या.
वाचा: शुटिंग दरम्यान तेजश्री प्रधान डायलॉग विसरली अन्...; पुढे काय झाले पाहा मजेशीर व्हिडीओ

पुढे त्या म्हणाल्या, “तेव्हा मला ते बेबी बोलायचे. ‘बेबी तुमको थोडा जाडा होना मंगता हैं’ असे मला ते नेहमी सांगायचे. कारण, त्यावेळी कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री फार धष्टपुष्ट असायच्या. त्या चित्रपटासाठी माझे फोटोशूट झाले आणि आम्ही त्याठिकाणी शूटिंगला पोहोचलो. त्यात माझे अंबरीशबरोबर टू पिस म्हणजेच स्विमिंग सूट घालून एक गाणे होते. ते ऐकूनच मला घाम फुटला.”

स्विमिंग सूट घालायला लागणार असल्यामुळे वर्षा उसगावकर या थेट सेटवरुन पळून आल्या होत्या. मात्र, त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले होते. याविषयी सांगताना वर्षा म्हणाल्या की, “स्विमसूटबद्दल ऐकल्यावर मी हे करू शकत नाही असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर दिग्दर्शकाबरोबर माझी एका मिटींग झाली. त्यांना मी सांगितलं की, माझं ब्रह्मचारी म्हणून नाटक आहे त्यात मी शॉर्ट्स घालते तसं मी घालेन पण, हे नाही जमणार. त्यावर त्यांनी टू पिस घालावा लागेल असं सांगितलं. ही साधारण १९८८ ते १९८९ च्या काळातील गोष्ट असेल. स्विमिंग सूटची अट ऐकल्यावर मी आणि माझी आई आम्ही दुसऱ्या क्षणाला फ्लाइट पकडून गोव्यात ( अभिनेत्रीच्या घरी ) परतलो. टू पिसचं नाव ऐकून मी बंगळुरूहून घरी पळून आले होते. शूटिंग सोडून अभिनेत्री घरी आल्यावर माझे वडील म्हणाले, तुला चित्रपटांत काम करायचं आहे ना? मग हे सोडून का आलीस…तू हे करायलं पाहिजे होतं. तुझी तयारी पाहिजे होती. ज्या वडिलांचा मला आयुष्यभर धाक वाटत होता. ते मला पाठिंबा देत होते. ”

IPL_Entry_Point