मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Laxmikant Berde: मी लक्षाच्या एका शब्दावर...; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत वर्षा उसगावकर भावूक

Laxmikant Berde: मी लक्षाच्या एका शब्दावर...; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत वर्षा उसगावकर भावूक

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 17, 2024 12:22 PM IST

Varsha Usgaonkar : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Varsha Usgaonkar
Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar Get Emotional: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे उर्षा उसगांवकर. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. त्यांचा 'गंमत जंमत' हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळा ट्रेंड सेट केला होता. आता नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्षा उसगांवकर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

वर्षा उसगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 'विदुषक' या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांच्या आठवणीत वर्षा उसगावकर या भावूक झाल्या आहेत. एक होता विदुषक या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना केलेला फोन आणि त्यानंतर त्यांनी त्या चित्रपटाची केलेली निवड यासंदर्भात भाष्य केले आहे.
वाचा: संजना सोडणार देशमुखांचे घर? जाणून घ्या काय घडणार आजच्या भागात

वर्षा उसगावकर चित्रपटाविषयी म्हटले की, 'लक्ष्याची त्यावेळी एक विनोदवीर म्हणून प्रचंड लोकप्रियता निर्माण झाली होती. त्यामुळे त्याला वेगळे काहीतरी करायचे होते. त्यावेळी जब्बार पटेल यांनी त्याला एक होता विदुषक हा चित्रपट ऑफर केला. पु.ल.देशपांडे यांनी त्या चित्रपटाचे संवाद लिहिले होते. तेव्हा लक्ष्याने मला फोन केला आणि सांगितले वर्षा तुला हा चित्रपट करायचा आहे. यामध्ये विदुषकाचा रोल मी करतोय आणि या चित्रपटात तू मला हवी आहेस. तिथे पैशांचा विचार करु नकोस. तुला कदाचित कमी पैसे मिळतील, पण माझ्यासाठी तू हा चित्रपट कर. त्यानंतर जब्बार पटेल यांनी मला ती कथा ऐकवली आणि मला ती आवडली.'

पुढे त्या म्हणाल्या की, 'एक होता विदुषक या चित्रपटात लक्ष्याने उत्तम काम केले होते. खूप मेहनत घेतली होती. तो शूटींगच्या वेळी त्याचा सीन नसला तरीही प्रत्येक सीनला हजर असायचा. पण तो चित्रपट म्हणावा तितका चालला नाही. त्या चित्रपटामधले लक्ष्याचे काम हे अॅवॉर्ड विनिंग होते. पण त्यावर्षी त्याला पुरस्कार मिळाला नाही, लक्ष्याच्या मनातही ही खंत राहिली आहे.'

IPL_Entry_Point