मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे उर्षा उसगांवकर. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत असताना वर्षा या आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. त्यामुळे जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
वयाची पन्नाशी ओलांडूनही चिरतरुण दिसणाऱ्या वर्षा यांनी एकेकाळी इंग्रजी मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये त्या टॉपलेस दिसल्या होत्या. मराठी इंडस्ट्रीमध्ये वर्षा या मॉर्डन अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. तरी देखील हे फोटोशूट पाहून त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
वाचा: 'अमर फोटो स्टुडिओ'नंतर सखी-सुव्रत पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या नाटकाची घोषणा!
वर्षा यांनी महाभारत या लोकप्रिय हिंदी मालिकेत अभिमन्यूची पत्नी 'उत्तरा'ची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'चंद्रकांता' मालिकेत त्यांनी' 'रुपमती' ही भूमिका निभावली होती. शिवाय त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये आधुनिक पण गोंडस, बबली, सोज्वळ अशाच भूमिका साकारल्या होत्या. त्यांची अशी छाप असताना टॉपलेस फोटोशूटने खळबळ उडाली होती.
वर्षा यांना एकदा दाक्षिणात्य चित्रपटाची देखील ऑफर आली होती. त्यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. “‘गंमत जंमत’ प्रदर्शित झाल्यावर मला कन्नड चित्रपटसृष्टीतील निर्माते भेटायला आले होते. त्या चित्रपटाचे नाव ‘अर्जुन’ असे होते. त्यावेळी सुपरस्टार अंबरीश यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मला मिळाली होती. ते आता हयात नाही. त्या चित्रपटात ज्या मुलीचे पात्र मी साकारणार होते ती नॉर्थ इंडियन होती. तेव्हा मला ते बेबी बोलायचे. ‘बेबी तुमको थोडा जाडा होना मंगता हैं’ असे मला ते नेहमी सांगायचे. कारण, त्यावेळी कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री फार धष्टपुष्ट असायच्या. त्या चित्रपटासाठी माझे फोटोशूट झाले आणि आम्ही त्याठिकाणी शूटिंगला पोहोचलो. त्यात माझे अंबरीशबरोबर टू पिस म्हणजेच स्विमिंग सूट घालून एक गाणे होते. ते ऐकूनच मला घाम फुटला” असे वर्षा म्हणाल्या.
कामाविषयी बोलायचे झाले तर वर्षा या सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असते' या मालिकेत काम करताना दिसत होत्या. त्या मालिकेत गौरी शिर्केपाटील हिच्या सासूच्या भूमिकेत दिसल्या. त्यांची माई ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. पण बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी होण्यासाठी त्यांनी या मालिकेला रामराम ठोकला आहे. आता बिग बॉसच्या घरात वर्षा काय डाव आखणार, कोणाशी मैत्री करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या