मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Varsha Usgaonkar Birthday: मॅगझिनवरील टॉपलेस फोटोमुळे वर्षा उसगांवकरांनी माजवली होती खळबळ!

Varsha Usgaonkar Birthday: मॅगझिनवरील टॉपलेस फोटोमुळे वर्षा उसगांवकरांनी माजवली होती खळबळ!

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 28, 2023 07:57 AM IST

Varsha Usgaonkar: आज २८ फेब्रुवारी रोजी वर्षा उसगावकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी...

वर्षा उसगावकर
वर्षा उसगावकर (HT)

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे उर्षा उसगांवकर. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. आज २८ फेब्रुवारी रोजी वर्षा उसगांवकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

वयाची पन्नाशी ओलांडूनही चिरतरुण दिसणाऱ्या वर्षा यांनी एकेकाळी इंग्रजी मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये त्या टॉपलेस दिसल्या होत्या. मराठी इंडस्ट्रीमध्ये वर्षा या मॉर्डन अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. तरी देखील हे फोटोशूट पाहून त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो, कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

वर्षा यांनी महाभारत या लोकप्रिय हिंदी मालिकेत अभिमन्यूची पत्नी 'उत्तरा'ची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'चंद्रकांता' मालिकेत त्यांनी' 'रुपमती' ही भूमिका निभावली होती. शिवाय त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये आधुनिक पण गोंडस, बबली, सोज्वळ अशाच भूमिका साकारल्या होत्या. त्यांची अशी छाप असताना टॉपलेस फोटोशूटने खळबळ उडाली होती.

कामाविषयी बोलायचे झाले तर वर्षा या सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असते' या मालिकेत काम करताना दिसत आहेत. त्या मालिकेत गौरी शिर्केपाटील हिच्या सासूच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांची माई ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.

IPL_Entry_Point

विभाग