Vanvaas Box Office Collection Day 5 : सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटांना संथ प्रतिसाद मिळताना दिसतोय. यातच अनिल शर्मा दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर अभिनीत 'वनवास'ची परिस्थिती बॉक्स ऑफिसवर गडगडताना दिसत आहे. या चित्रपटाची कमाई पाहता फारच कमी प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येत असल्याचे दिसते. झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाची कथा खूपच भावूक करणारी असून, कुटुंबासोबत याचा आनंद लुटता येईल. ५व्या दिवशी या चित्रपटाची कमाई किती झाली, हे जाणून घेऊया...
नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा यांच्या 'वनवास' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ०.६ कोटींची कमाई केली होती. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ०.९५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी १.४ कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी ०.४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकिंग वेबसाईट, सॅकनिल्कच्या अहवालानुसार, पाचव्या दिवशी देखील चित्रपटाने सकाळ आणि दुपारच्या शोसह ०.५० कोटी रुपयांची कमाई केली. 'वनवास'चे एकूण कलेक्शन ३.८५ कोटींवर पोहोचले आहे.
वनवास बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १ - ६५ लाख
वनवास बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २- १ कोटी
वनवास बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३- १.१५ कोटी
वनवास बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४- ४० लाख कोटी
वनवास बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ५ - ५० लाख
वनवास एकूण कलेक्शन - ३.८५ कोटी
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर, अनिल शर्मा दिग्दर्शित 'वनवास' हा दिपक त्यागी (नाना पाटेकर) यांच्या भोवती फिरतो, ज्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यांची मुले त्यांना मरण यातना भोगायला सोडून देतात. वाराणसीमध्ये दीपक त्यागी यांना एक तरुण भेटतो, जो आधी त्यांना त्रास देतो. मात्र, हळूहळू त्याला त्यांची स्थिती कळू लागते. आणि तो त्यांना मदत करतो. अतिशय भावनिक असे हे कथानक आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या वीकेंडमध्ये धमाकेदार कमाई करणे हा या चित्रपटाचा उद्देश होता. मात्र, असे होऊ शकले नाही. वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट आज म्हणजेच २५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे . त्यानंतर चित्रपटाचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या