छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'वंशज' मध्ये काम करणारा अभिनेता माहिर पांधी याच्या गाडीवर मुंबईत गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुंडांनी गाडीची तोडफोड करत त्याला लुटण्याचा प्रयत्न केसा. पण माहिरला कोणतीही दुखापत झाली नाही. तो सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यासोबतच त्याने मुंबई खरंच सुरक्षित आहे का, असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.
अभिनेता माहिर पांधीला मुंबईत धक्कादायक घटनेला सामोरे जावे लागले आहे. माहिरवर एका गुंडांच्या टोळीने हल्ला केला. गुड्डांनी त्याच्या गाडीची तोडफोड केली. त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. माहिरने सोशल मीडियाच्या माध्यमातून घडलेला प्रकार सांगितला. सुदैवाने माहीर गाडीमध्ये नसताना हा हल्ला झाला. मात्र, तरीही मुंबईत अशी घटना घडल्यानंतर त्याने असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे सार्वजनिक जागांवर सुरक्षिततेबद्दल आणि वाढीव सुरक्षा उपाय करणे गरजेचे असल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले आहे.
माहिरच्या गाडीवर हा हल्ला झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याने सर्वांना सावध राहण्याचे आवाहान केले आहे. त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला, "आज माझ्यावर दिवसाढवळ्या दोन गुंडांनी हल्ला केला. त्यांनी खिडक्या तोडण्याचा प्रयत्न केला आणि गाडीचे आरसे तोडले. हा रोड रेज नव्हता. हा तोडफोड करण्याचा खरा प्रयत्न होता आणि लुटण्याचा प्रयत्न होता" अशी पोस्ट त्याने केली आहे.
माहिरने पुढे पोस्टमध्ये, "मुंबई खरंच सुरक्षित आहे का?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. पण या घटनेने मात्र अनेकजण मुंबईतील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
वाचा: एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती
माहिर पांधीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला वंशज या मालिकेने खरी प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेपूर्वी त्याने छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. तो छोटी सरदारनी या लोकप्रिय मालिकेत दिसला होता. आता माहिरसोबत घडलेला प्रकार ऐकून सर्वांना धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.
संबंधित बातम्या