Valentines Day 2024 Special Movie: जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा अर्थात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी जोड्या आपलं जोडीदारावरील प्रेम व्यक्त करतात. बॉलिवूड चित्रपट म्हटले की, त्यात प्रेम आणि रोमान्स भरभरून असतो. त्यामुळे या दिवशी घर बसून आपल्या पार्टनरसोबत जर रोमँटिक चित्रपट पाहायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा...
अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'जब वी मेट' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हा चित्रपट पाहाणे योग्य पर्याय ठरणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी हिंदी सिनेमात केले होते काम, मनसेने शेअर केला व्हिडीओ
सैफ अली खान, दिया मिर्झा आणि आर माधवनचा रहना है तेरे दिल मै हा चित्रपट विशेष चर्चेत होता. २००१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. हा चित्रपट घर बसल्या हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
सिद्धार्थ रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा 'आशिकी २' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटातील गाणी देखील हिट ठरली होती. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमच्या पार्टनरसोबत यूट्यूबवर पाहाता येणार आहे.
अभिनेता रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा आणि इलियाना डिक्रूज महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हा चित्रपट पार्टनरसोबत पाहणे योग्य पर्याय ठरणार आहे.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. हा चित्रपट जिओ सिनेमालवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली होती.