आयुष्यात अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जाते. मग ते सरप्राईज काहीही असते. हे जवळपास सर्वांनाच मान्य असेल. अशाच एका कपलच्या आयुष्यात देखील अनपेक्षीत सरप्राईज येत आणि त्यांचे आयुष्य बदलून जाते. यावर 'एक दोन तीन चार' या चित्रपटाची कथा अवलंबून आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर तुफान गाजतोय.
'एक दोन तीन चार' या चित्रपटाच्या १ मिनिट २९ सेकंदाच्या टीझरमध्ये सम्या आणि सायली या क्यूट कपलची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. पण सर्वकाही सुरळीत सुरु असताना त्यांच्यावर अनपेक्षीत बॉम्ब फुटतो आणि या जोडप्याच्या आयुष्यातला हा अनोखा ट्विस्ट काय आहे ह्याची छोटीशी झलक आपल्याला टीझर मधून कळते. आता हा हॅपिनेसचा बुम्म त्यांच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवणार आहे, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.
वाचा: गौरव मोरेचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट कसा आहे? जाणून घ्या प्रेक्षकांकडून
'एक दोन तीन चार' या चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर आणि इतर काही कलाकार दिसणार आहेत. इतकच नव्हे तर ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीया इन्फ्लुन्सर ‘करण सोनावणे‘ सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे.
वाचा: 'भारतात २०१४मध्ये पाकिस्तानी अभिनेत्याची प्रचंड क्रेझ होती', रत्ना पाठक यांनी सांगितला किस्सा
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मीत बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांच्या साहाय्याने "एक दोन तीन चार" हा वरूण नार्वेकर दिग्दर्शित मराठी सिनेमा १९ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या 'द्विधा' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित
२०२३ मध्ये वैदेही 'जग्गू आणि ज्यूलिएट' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात अमेय वाघ तिच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत होता. त्यापूर्वी ती २०२२मध्ये झोंबिवली आणि लोचा झाला रे या चित्रपटात दिसली होती. आता जवळपास वर्षभरानंतर वैदेही पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंद झाला आहे. तिच्या या ‘एक दोन तीन चार’ चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या