मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vaidehi Parashurami : अचानक तब्बूने फोन केला अन्...; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितली गोड आठवण

Vaidehi Parashurami : अचानक तब्बूने फोन केला अन्...; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितली गोड आठवण

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 03, 2024 06:45 PM IST

Vaidehi Parashurami Share Momery: वैदेही परशुरामी तिच्या कामामुळे कायच चर्चेत असते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Vaidehi Parashurami Share Momery
Vaidehi Parashurami Share Momery

Vaidehi Parashurami and Tabu: जेव्हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री तब्बू एखाद्या मराठमोळ्या अभिनेत्रीला फोन करते तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल? याची कल्पना सर्वजण करु शकतात. असेच काही अभिनेत्री वैदेही परशुरामीसोबत घडले होते. तब्बूने वैदेहीचे फोन करुन कौतुक केले होते. पण नेमकं काय झाले होते हे वैदेहीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. चला जाणून घेऊया...

वैदेहीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एक गोड आठवण सांगितली आहे. वैदेही परशुरामी ही सिम्बा (Simba) या चित्रपटात साकारलेली आकृती दवे ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस पडली. तिच्या या कामाचे तब्बूने (Tabbu) फोन करुन कौतुक केल्याचे वैदेहीने सांगितले.
वाचा: अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ हॉलिवूड गाजवणार; इंग्रजी रिमेक येतोय!

तब्बू फोन करुन केले वैदेहीचे कौतुक

रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा या चित्रपटात वैदेहीने रणवीर सिंहसोबत काम केले. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिच्या या भूमिकेचे तब्बूने फोन करुन कौतुक केले होते. आतापर्यंत तुझ्या कामासाठी तुला मिळालेली सर्वात चांगली प्रतिक्रिया कोणती? असा प्रश्न वैदेहीला या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत वैदेही म्हणाली, आतापर्यंत अनेकांनी मला माझ्या कामासाठी प्रतिक्रिया दिल्या आहेत,अनेकांनी कौतुकाची थाप दिलीये. पण या सगळ्यात लक्षात राहिलेली प्रतिक्रिया ही तब्बूने मला दिली होती. माझे सिम्बा मधले काम पाहून तिने मला थेट फोन केला होता. तेव्हा तिच्याशी बोलताना मी फक्त रडत होते. मी तब्बूच्या कामाची खूप मोठी चाहती आहे, त्यामुळे तिचा फोन येणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
वाचा: ‘भिडे मास्तरां’ची लेक लग्न बंधनात अडकणार; झील मेहताच्या विवाह सोहळ्याची झाली सुरुवात!

पुढे वैदेही म्हणाली की, मी तब्बूचे काम अगदी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून पाहत आलेय. जेव्हा मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हापासून तिचे काम पाहत आले आहे. मला तिचे काम प्रचंड आवडते. माझ्यासाठी तब्बू हे इन्स्पीरेशन आहे. तिच्या आजवरच्या सगळ्या भूमिका मला आवडतात. त्यामुळे तिने खास माझ्या कामाचे कौतुक करण्यासाठी मला फोन करणे ही गोष्ट मी कधीच विसरु शकत नाही.
वाचा: सुभेदारांच्या घरात येणार नवं वादळ; महिपत शिखरे रचणार नवा डाव! पुढे काय होणार?

IPL_Entry_Point