मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वैभव तत्‍ववादी दिसणार 'निर्मल पाठक की घरवापसी' सीरिजमध्ये
वैभव तत्ववादी
वैभव तत्ववादी (HT)
21 May 2022, 5:12 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
21 May 2022, 5:12 AM IST
  • ही सीरिज २७ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

असे म्‍हणतात की, आपण आपल्‍या कम्‍फर्ट झोनमधून बाहेर पडलो की आपोआप बदल सुरू होतो आणि हीच बाब सिरीज 'निर्मल पाठक की घरवापसी' घेऊन येत आहे. बिहारमधील लहान नगराच्‍या पार्श्‍वभूमीवर आधारित सोनीलिव्‍हवरील आगामी सिरीज 'निर्मल पाठक की घरवापसी' स्‍पेशल ड्रामा आहे, जो हृदयस्‍पर्शी मनोरंजनाच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना वास्‍तविकतेची जाणीव करून देतो. वैभव तत्‍ववादीने साकारलेली भूमिका निर्मल पाठक हा तरूण आहे, जो २४ वर्षांनंतर त्‍याच्‍या मूळगावी परतला आहे आणि त्‍याची कथा त्‍याचे मूळ शोधण्‍याच्‍या प्रवासाच्‍या अवतीभोवती फिरते. वैभव तत्‍ववादीप्रमाणेच निर्मल पाठक लाजाळू व संकुचित वृत्तीचा आहे आणि याच बाबीमुळे त्‍याला सहजपणे भूमिकेमध्‍ये सामावून जाता आले.

ट्रेंडिंग न्यूज

'निर्मल पाठक की घरवापसी'च्‍या संकल्‍पनेबाबत सांगताना वैभव म्‍हणाला, ''सिरीज आपल्‍या समाजाबाबत बरेच काही सांगते आणि मला या सिरीजचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे. ही आपले मूळ शोधणा-या मुलाची कथा आहे. सिरीजच्‍या नावाशी संलग्‍न भूमिकेचे नाव असण्‍याची भावना नेहमीच खूप खास असते.''

आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना तो म्‍हणाला, ''मी वास्‍तविक जीवनात निर्मल पाठकसारखाच आहे. पटकथा वाचल्‍यानंतर मला समजले की, तो माझ्यासारखाच लाजाळू आहे. तो कमी बोलणारा आहे आणि याच गोष्‍टीशी मी सहजरित्‍या संलग्‍न होऊ शकतो.''

नरेन कुमार हे 'निर्मल पाठक की घरवापसी'चे शो रनर आहेत. या सिरीजचे लेखन राहुल पांडे यांनी केले असून दिग्‍दर्शन राहुल पांडे व सतिश नायर यांनी केले आहे. कायरा कुमार क्रिएशन्‍स निर्मित या सिरीजचे निर्माते नरेन कुमार व महेश कोराडे आहेत. या सिरीजमध्‍ये वैभव तत्‍ववादी, अल्‍का आमिन, विनीत कुमार, पंकज झा, आकाश मखिजा, कुमार सौरभ, गरिमा श्रीवास्‍तव आणि इशिता गांगुली हे कलाकार आहेत. सिरीज सुरू होत आहे २७ मे पासून सोनीलिव्‍हवर.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook