Vaibhav Mangale: वैभव मांगले पुन्हा रंगभूमीवर, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटक या दिवशी येणार भेटीला-vaibhav mangale upcoming marathi natak murderwale kulkarni ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vaibhav Mangale: वैभव मांगले पुन्हा रंगभूमीवर, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटक या दिवशी येणार भेटीला

Vaibhav Mangale: वैभव मांगले पुन्हा रंगभूमीवर, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटक या दिवशी येणार भेटीला

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 18, 2023 05:55 PM IST

Vaibhav Mangale upcoming marathi natak: ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या आगामी नाटकात वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार पहिल्यांदा काम एकत्र काम करताना दिसणार आहेत.

Vaibhav Mangale
Vaibhav Mangale

विनोदाच्या अफलातून टायमिंगने रसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या आगामी नाटकात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. हे नाटक पाहणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे.

‘मर्डरवाले कुलकर्णी’ हे नाटक येत्या २४ नोव्हेंबरला रंगभूमीवर दाखल होणार आहे. वैभव मांगले यात मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार यांच्या भन्नाट दिग्दर्शनाखाली या नाटकाचा पट रंगला आहे. अष्टविनायक संस्थेचे दिलीप जाधव यांनी नाटकाची निर्मिती केली असून सहनिर्मात्या मयुरी मांगले आणि निवेदिता सराफ आहेत. संतोषची दिग्दर्शनाची अनोखी शैली आणि वैभव यांच्या अभिनयाचा हटके अंदाज ‘मर्डरवाले कुलकर्णी’ मध्ये धुमाकूळ घालणार हे नक्की.
वाचा: व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरांनी मागितली माफी, काय आहे नेमकं प्रकरण?

प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी आम्ही सज्ज असून आमच्या दोघांची केमिस्ट्री ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकामध्ये सॉलिड धमाल आणेल, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. एकत्र काम करताना आम्हाला खूपच मजा आल्याचे हे दोघेही सांगतात.

अष्टविनायक संस्थेच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाचे लेखन जयंत उपाध्ये यांचे असून या निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. या नाटकाची गाणी वैभव जोशी यांनी लिहिली असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. प्रकाश योजना रविरसिक तर संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे.

Whats_app_banner