आपल्या सौंदर्याने आणि मादक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील कायमच चर्चेत असते. तिची प्रत्येक गाणी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावताना दिसतात. खेड्यापाड्यात आयोजित करण्यात आलेल्या गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमांना तुडूंब गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. कधीकधी ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त करण्यात येतो. आता गौतमीचा एक नवा अल्बम प्रदर्शित झाला आहे. या अल्बममध्ये तिच्यासोबत गायक उत्कर्ष शिंदे दिसत आहे. त्यांचा हा अल्बम सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उत्कर्ष शिंदेने काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलसोबत एक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमधील फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. नेमकं काय प्रकरण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता त्यांचा अल्बम प्रदर्शित झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या अल्बमवर काहींनी कौतुक करत कमेंट केली आहे तर काहींनी उत्कर्ष शिंदेला सुनावले आहे.
वाचा: बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई
गौतमी पाटील आणि उत्कर्ष शिंदेच्या या नव्या अल्बमचे नाव आलं बाई दाजी माझं असे आहे. या अल्बममध्ये गौतमी आणि उत्कर्ष शिंदे डान्स करताना दिसत आहेत. तसेच उत्कर्ष शिंदेने हा अल्बम लिहिला आहे. तसेच दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. हे गाणे वर्षा इखंडेने गायले आहे. गाण्यामध्ये गौतमीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. केसात गजरा, नाकात नथ असा गौतमीचा घायाळ लूक दिसत आहे. तर उत्कर्षने काळ्या रंगाचे ब्लेझर घातले आहे. दोघांचा ही लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: गौरव मोरेच्या 'मॅड' अदांवर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फिदा! पाहा रोमँटिक व्हिडीओ
सोशल मीडियावर गौतमी पाटील आणि उत्कर्ष शिंदेचा हा अल्बम व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. काही यूजर्सने दोघांचे कौतुक केले तर काहींनी उत्कर्षला गौतमीसोबत डान्स केल्यामुळे सुनावले आहे. एका यूजरने 'काय वाईट दिवस आले आहेत तुमचे, तुम्हाला हिच्यासोबत व्हिडीओ करावा लागतोय' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'दादासाठी फक्त लाईक करतोय' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए।' असे म्हणत गौतमीचे कौतुक केले आहे.
वाचा: 'हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे', अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती