Rashid Khan : प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं निधन; वयाच्या ५५व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rashid Khan : प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं निधन; वयाच्या ५५व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Rashid Khan : प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं निधन; वयाच्या ५५व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Updated Jan 09, 2024 06:15 PM IST

Ustad Rashid Khan Passed Away: शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांनी कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Ustad Rashid Khan Passed Away
Ustad Rashid Khan Passed Away

Ustad Rashid Khan Passed Away: प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचे वयाच्या ५५व्या वर्षी निधन झाले आहे. कोलकाता येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राशिद खान यांच्या निधनामुळं संगीतविश्वाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

राशिद खान हे गेल्या काही काळापासून प्रोस्टेट कर्करोगाशी झुंज देत होते. राशिद खान यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात सेरेब्रल अटॅकनंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. राशिद खान हे रामपूर-सहस्वान घराण्यातील खान हे घराण्याचे संस्थापक इनायत हुसेन खान यांचे पणतू होते.

रामपूर-सहस्वान घराण्याचे गायक असणारे राशिद खान मागील बऱ्याच काळापासून प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त होते. या दरम्यान, टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले जात होते. मात्र, नंतर त्यांनी कोलकात्यातच उपचार घेण्यास प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 गेल्या महिन्यात आलेल्या सेरेब्रल अटॅकनंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. यानंतर त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली होती. दरम्यान त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तर, डॉक्टरांची टीम सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होती. मात्र, त्यांचा हा कर्करोगाशी असलेला लढा अपयशी ठरला आहे.

प्रसिद्ध गायक राशिद खान यांनी वयाच्या अवघ्या ११ वर्षी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या रामपूर-सहस्वान घराण्याची सुरुवात मेहबूब खान आणि त्यांचा मुलगा इनायत हुसेन खान यांच्यापासून झाली होती. राशिद खान हे प्रामुख्याने शास्त्रीय गायक म्हणून प्रसिद्ध होते. मात्र, शास्त्रीय गाण्यांशिवाय त्यांची फ्यूजन आणि चित्रपट गीते देखील गाजली होती. गाण्यांच्या माध्यमातून ते रसिक प्रेक्षकांच्या मनात वसले होते. त्यांनी 'माय नेम इज खान', 'राज ३, 'बापी बारी जा', 'कादंबरी', 'शादी में जरूर आना', 'मंटो'आणि'मीटीन मास'यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली होती.

Whats_app_banner