गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सतत चर्चेत आहे. कधी तिच्या वक्तव्यांमुळे तर कधी तिच्या सिनेमांमुळे. नुकताच उर्वशीचा डाकू महाराजा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तिला अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याविषयी विचारण्यात आले. पण उर्वशीने त्यावर जे काही उत्तर दिले ते पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. ते पाहून आता उर्वशीने स्पष्टीकरण दिले आहे. उर्वशी नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया...
उर्वशीने नुकताच फिल्म फेअरला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, 'सैफच्या केसला उत्तर देताना मी अधिक सावध राहायला हवं होतं. ही घटना पहाटे ४ वाजता घडली आणि माझी मुलाखत सकाळी ८ वाजता झाली. त्यामुळे मला कळत नव्हतं नेमकं काय बोलावं. मला एवढंच आठवतंय की सकाळी उठल्यावर कुणीतरी मला सांगितलं की सैफला दुखापत झाली आहे. त्याला किती खोल दुखापत झाली होती ते मला कळत नव्हतं. सिनेसृष्टीतील असल्याने माझ्या संपूर्ण भावना त्यांच्यासोबत आहेत. आता तो बरा झाला आहे, पण त्याच्यासोबत नेमकं काय झालं हे मला आतापर्यंत कळाले नाही. प्रत्येकजण वेगवेगळा किस्सा सांगत असतो, त्यामुळे कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर विश्वास ठेवू नये हेच कळत नाही.'
उर्वशीपुढे म्हणाली की, ही मुलाखत तिच्या डाकू महाराज चित्रपटाच्या यशासाठी होती. त्यामुळे तिने फार इतर गोष्टींचा विचार केला नव्हता. 'मी माझ्या चित्रपटाबद्दल सतत बोलत राहिले. कारण ती मुलाखत त्यासाठीच होती. माझं माझ्या आई-वडिलांवर खूप प्रेम आहे, ते माझ्यासाठी देवासारखे आहेत. त्यांनी मला भेटवस्तू दिल्या त्याने मला आणखी प्रोत्साहन मिळाले. मी उत्साहात माझे भान हरपते' असे उर्वशी म्हणाली.
वाचा: राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास, अजामीनपात्र वॉरंट जारी
याआधी उर्वशीला एका मुलाखतीमध्ये सैफवर झालेल्या हल्ल्याविषयी विचारण्यात आले होते. त्यावर तिने, 'हे खूप चुकीचे आहे. आता माझ्या डाकू महाराज या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे माझ्या आईने मला डायमंड रोलेक्स दिले आणि माझ्या वडिलांनी मला एक मिनी घड्याळ दिले आहे जे माझ्या बोटात आहे. पण आम्हाला ते उघडपणे घालता येत नाही. कारण आमच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. आमच्या आजूबाजूला अशी असुरक्षितता आहे. जे काही घडलं ते अत्यंत चुकीचं होतं' असे उत्तर दिले होते. या उत्तरामुळे तिला ट्रोल करण्यात आले.
संबंधित बातम्या