Urvashi Rautela Viral Video: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेला ओळखली जाते. सध्या तिचा आगामी 'डाकू महाराज' सिनेमा चर्चेत आहे. या चित्रपटात उर्वशीसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण मुख्य भूमिकेत आहे. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ही बरीच कमाई करत आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील नंदमुरी बालकृष्ण यांची कृती पाहून चाहते त्यांच्यावर संतापले आहेत.
उर्वशी रौतेलाने १३ जानेवारी ला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये उर्वशी 'डाकू महाराज' चित्रपटातील सहकलाकार नंदमुरी बालकृष्ण सोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये 'डाकू महाराज' सिनेमाचं गाणं वाजत आहे. हा व्हिडिओ एका कार्यक्रमातील आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, नंदमुरी अचानक उर्वशीचा हात पकडून तिला वारंवार डान्स करण्यास भाग पाडतात. अभिनेत्री यावेळी अस्वस्थ होताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
या व्हिडीओमध्ये उर्वशी रौतेलाने गुलाबी रंगाची शिमरी साडी नेसली आहे. या साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तर नंदमुरीने गडद निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. सध्या सोशल मीडियावर उर्वशीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यांचे कृत्य पाहून टिका केली आहे.
वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास अडकणार विवाहबंधनात, कोण आहे ती मुलगी?
हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर युजर्सचा संताप अनावर झाला आहे. यावर कमेंट करत एका युजरने लिहिले की, 'नाचत तो आहे पण मला लाज वाटत आहे.' दुसऱ्या एका यूजरने 'हा व्हिडीओ पाहून मला अस्वस्थ वाटत आहे' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'आजोबा आपल्या नातीसोबत' अशी मजेशीर कमेंट केली आहे.
संबंधित बातम्या