मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 04, 2024 07:55 AM IST

‘शुभ मंगल सावधान’ हा चित्रपट अनेक कारणांमुळे उर्मिलासाठी खूप ठरला होता. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान उर्मिला कानेटकर आणि महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे यांच्यात मैत्री झाली.

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?
मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते महेश कोठारे यांनी आजवर निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून अनेक सुपरहिट चित्रपट मनोरंजन विश्वाला दिले. इतकंच नाही, तर त्यांनी आपल्या चित्रपटांमधून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. अशा नव्या चेहऱ्यांपैकी एक उर्मिला कानेटकर होती. त्यांच्या एका चित्रपटाची मुख्य अभिनेत्री असलेली उर्मिला कानिटकर पुढे जाऊन महेश कोठारेंच्या घरची सून बनली आणि उर्मिला कोठारे म्हणून मनोरंजन विश्वात गाजली. आज (४ मे) अभिनेत्री उर्मिला कोठारे ही तिचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन प्रा. लि.' या बॅनरचा 'शुभ मंगल सावधान' हा चित्रपट २००६मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटातील मुख्य भूमिकांसाठी महेश कोठारे यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे दोन्ही कलाकार नवे होते. अभिनेता निरंजन जोशी आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट होता. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘शुभ मंगल सावधान’ हा चित्रपट अनेक कारणांमुळे उर्मिलासाठी खूप ठरला होता.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘रोशन सिंह सोढी’ साकारण्यासाठी गुरुचरण सिंहला किती मानधन मिळायचे?

आणि उर्मिला प्रेमात पडली!

या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान उर्मिला कानेटकर आणि महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे यांच्यात मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि काही वर्षांनी उर्मिला ही कोठारेंच्या घरची सून झाली. या दरम्यानच्या काळात उर्मिला चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत असल्याने ती मनोरंजन विश्वाचा ओळखीचा चेहरा झाली होती. 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाच्या यशानंतर उर्मिला कानेटकर या नावाला मराठी मनोरंजन विश्वात खऱ्या अर्थाने स्थिरस्थावर होण्याची संधी मिळाली. वारंवार होऊ लागला.

गाजलेयत ‘हे’ मराठी चित्रपट!

उर्मिला कानेटकर-कोठारे ही मुळची पुण्याची आहे. तिचा जन्म ४ मे १९८६ रोजी पुण्यात झाला होता. मात्र, शिक्षणाच्या निमित्ताने उर्मिला मुंबईत आली. मुंबईच्या प्रसिद्ध 'सेंट झेवियर्स महाविद्यालया'तून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी उर्मिलाने 'तुझ्या विना' या मराठी मालिकेमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने काही हिंदी मालिकांमध्ये देखील आपलं नशीब आजमावलं. याशिवाय तिने अनेक सुपरहिट चित्रपट देखील केले आहेत. ‘दुनियादारी’, ‘गुरु’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘काकण’, ‘मला आई व्हायचंय’, ‘अनवट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उर्मिला कोठारेने दमदार अभिनय केला आहे. तिचे गाजलेले हे मराठी चित्रपट नक्कीच बघयला हवेत.

IPL_Entry_Point