मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: लेहेंगा अन् साजशृंगार; अरे ही नक्की उर्फीच ना? अभिनेत्रीचा व्हिडीओ होतोय व्हायरल!
Urfi Javed
Urfi Javed

Viral Video: लेहेंगा अन् साजशृंगार; अरे ही नक्की उर्फीच ना? अभिनेत्रीचा व्हिडीओ होतोय व्हायरल!

23 January 2023, 11:40 ISTHarshada Bhirvandekar

Urfi Javed Viral Video: अभिनेत्रीला या अवतारात पाहून ही नक्की उर्फी जावेदच आहे ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Urfi Javed Viral Video: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच ट्रोल होत असते. कधी काचा, तर कधी मोबाईलची वायर उर्फी अगदी कशापासूनही कपडे तयार करत असते. सोशल मीडियावर अनेकदा ती बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नेहमीच बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी चक्क लेहेंगाचोली आणि साजशृंगार करून दिसत आहे. उर्फिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील अवाक् झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्रीला या अवतारात पाहून ही नक्की उर्फी जावेदच आहे ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने सुंदर लेहेंगा परिधान केला आहे. तर, गळ्यात दागिने आणि मेकअप केलेली उर्फी अतिशय सुंदर दिसत आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ एका मालिकेतील असून, या सीनमध्ये ती नववधूच्या वेशात दिसत आहे. उर्फी जावेदचा हा लूक पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.

एकीकडे उर्फी तिच्या अर्धनग्न कपड्यांमुळे ट्रोल होत असतानाच तिचा हा व्हिडीओ देखील प्रचंड चर्चेत आला आहे. तिच्या या लूकचे चाहते कौतुक करत आहेत. तिच्या या सोज्वळ लूकवर चाहते फिदा झाले आहेत. या लूकमध्ये उर्फी खूप सुंदर दिसत असल्याचे चाहते म्हणत आहेत. तर, काहींनी ही आपलीच उर्फी आहे ना? हिला नक्की काय झालं आहे? अशा कमेंट्स केल्या आहेत.

उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. सोशल मीडियावर नेहमीच अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीने या व्हिडीओमध्ये चक्क संपूर्ण अंग झाकणारा आऊटफिट परिधान केला आहे. मात्र, या सुंदर आऊटफिटने उर्फी जावेदच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. उर्फी मॉडेल असण्याव्यतिरिक्त अभिनेत्री देखील आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.