Urfi Javed: उर्फी जावेद तिच्या अतरंगी ड्रेस आणि बिनधास्त वक्तव्यामुळे विशेष ओळखली जाते. पण गेल्या काही दिवसांपासून उर्फीची 'फॉलो कर लो यार' ही सीरिज चर्चेत आहे. सध्या ती या सीरिजचे प्रमोशन करताना दिसत आहे. या प्रोमोशनसाठी तिने अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली तसेच काहींना मुलाखत दिल्या. एका मुलाखतीमध्ये उर्फीला स्टार किड्सविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
उर्फी जावेदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुहाना खान आणि अनन्या पांडे बाहेरच्या व्यक्तींशी कसे वागतात हे सांगितले. 'स्टार किड्स बाहेरच्या व्यक्तींवर वर्चस्व गाजवतात आणि त्यांच्यासाठी गोष्टी अगदी सोप्या असतात, अशी चर्चा इंडस्ट्रीत बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मात्र, याबाबत लोकांची वेगवेगळी भूमिका आहे' असे उर्फी म्हणाली.
उर्फी जावेदने नुकताच फिव्हर एफएमशी संवाद साधला. त्यावेळी उर्फीला स्टारकिड्स इतर लोकांशी कसे वागतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उर्फीने सांगितले की अनन्या पांडे एका पार्टीमध्ये स्वत:हून बोलायला आली होती. त्यानंतर सुहाना खान देखील स्वत:हून उर्फीला हाय बोलली होती. उर्फी जावेद म्हणाली, 'मला वाटले चूक झाली आहे. मला माफ करा मी उर्फी जावेद आहे, तू दुसऱ्या कोणाला शोधत आहेस का?' ती म्हणाली, "नाही, अर्थातच मी तुला ओळखते. कशी आहेस तू?"
उर्फी जावेद पुढे म्हणाली, 'या सर्व अभिनेत्री नवीन लोकांशी खूप चांगल्या वागतात. तान्या श्रॉफ देखील खूप चांगली आहे. ती किती चांगली मुलगी आहे. या लोकांना मी कोण आहे? या लोकांना खरंच माझ्याकडून काहीच मिळणार नाही. पण या लोकांचे संगोपन खरोखरच चांगले झाले आहे. तान्या श्रॉफशिवाय मी गौरीलाही भेटले होते. ती खूप गोड आहे. तिचा स्वभाव खूप चांगला आहे.' स्टार किड्सच्या वागण्याने उर्फी प्रभावीत झाली होती.
'आपण गौरीला इन्स्टाग्रामवर पाहतो की ती किती श्रीमंत आहे आणि ती किती प्रभावी आहे. पण तिच्याकडे जराही अॅटिट्यूड नाही. ती सर्वांशी नीट बोलते' असे उर्फी जावेद म्हणाली. तिने बॉलिवूडमधील कलाकार आणि स्टार किड्सचे कौतुक केले आहे. सर्वजण उर्फीला खूप चांगली वागणूक देत आहेत. उर्फीने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.
वाचा: अभिजीत सावंतचा बिग बॉस मराठीच्या घरातील गेम पाहून पत्नीने केली पोस्ट, म्हणाली...
उर्फी जावेद सलमान खानने होस्ट केलेल्या रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाली होती. या शोच्या पहिल्या सीझनमध्ये ती दिसली होती आणि घराबाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक होती. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेदच्या प्रसिद्धीचा आलेख वाढतच गेला. अभिनेत्री तिच्या आउटफिटमुळे चर्चेत होती.