सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. उर्फीने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेत्री म्हणून केली असली तरी तिला खरी ओळख मिळाली ती तिच्या अतरंगी कपड्यांमुळे. उर्फी सोशल मीडियावर तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. प्रत्येक वेळी उर्फीला यामुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. दरम्यान, उर्फीने तिच्या खासगी आयुष्याविषयी वक्तव्य केले आहे. उर्फीने सांगितले की, ती वयाच्या १७ व्या वर्षी घरातून का पळून गेली?
उर्फी जावेदने नुकताच 'इंडियाज बेस्ट डान्सर ४' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये 'उर्फी का चौका' या मजेदार थीमवर आधारित एपिसोड पार पडला. या एपिसोडमध्ये उर्फीने विशेष हजेरी लावली. या एपिसोडमध्ये उर्फीने खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. उर्फी तिच्या आगामी 'फॉलो कर लो यार' या सीरिजचे प्रोमोशन करण्यासाठी आली. यावेळी देखील उर्फीने अतरंगी ड्रेस परिधान केला होता.
'इंडियाज बेस्ट डान्सर ४' या शोमध्ये उर्फी जावेदने शोचे परीक्षक करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांच्याशी चर्चा करताना दिसली. त्यावेळी गीता कपूरने उर्फीला विचारले की, 'जेव्हा तुला स्वत:साठी असे स्थान बनवायचे होते, जे तू आज यशस्वीरित्या मिळव देखील शकली आहेस. तेव्हा तुला तुझ्या आई आणि वडिलांची समजूत काढावी लागली होती का?' त्यावर उर्फीने उत्तर देत म्हटले की, 'माझं कुटुंब हे खूप पुराणमतवादी होते. त्यामुळे जेव्हा मला हे सगळं करायचे होते तेव्हा मी घरातून पळून गेले. त्यावेळी मी केवळ १७ वर्षांची होते.'
वाचा: ‘तारक मेहता...’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!
पुढे उर्फी म्हणाली, 'पळून गेल्यामुळे मला कुणाचीही समजूत काढावी लागली नाही. नंतर मी आणि माझी बहीण आमच्या कुटुंबातील कमावणाऱ्या झालो. तेव्हापासून ते आजपर्यंत मी खूप काही पाहिले आणि अनुभवले देखील.' उर्फीचे बोलणे ऐकून परीक्षक गीताला धक्काच बसला. तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
उर्फीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती चंद्रनंदीनी, बडे भय्या की दुल्हनिया, मेरी दुर्गा, कसौटी जिंदगीकी या मालिकांमध्ये दिसली होती. त्यानंतर आता तिची फॉलो कर लो यार ही वेब सीरिज आली आहे.
संबंधित बातम्या