मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ वक्तव्यावर संतापली उर्फी जावेद! म्हणाली ‘मुलींनो...’

Urfi Javed: सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ वक्तव्यावर संतापली उर्फी जावेद! म्हणाली ‘मुलींनो...’

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 18, 2023 11:54 AM IST

Urfi Javed Reaction On Sonali Kulkarni Statement: उर्फी जावेद हिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नुकत्याच चर्चेत आलेल्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Urfi Javed
Urfi Javed

Urfi Javed Reaction On Sonali Kulkarni Statment: टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान आता उर्फी जावेद तिच्या नव्या वक्तव्यामुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. उर्फी जावेद हिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नुकत्याच चर्चेत आलेल्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, अभिनेत्रीने मुलींच्या वाढत्या मागणीचा स्वभाव आणि मुलांवरील वाढत्या दबावाबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओवर उर्फीने आपला संताप व्यक्त केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उर्फीने म्हटले की, मुलींना मागणी करण्याचा अधिकार आहे.

एकीकडे अनेक लोक सोनाली कुलकर्णीच्या व्हिडिओचे समर्थन करत आहेत. तर, दुसरीकडे सोनालीला प्रचंड ट्रोलही केले जात आहे. आता उर्फी जावेदने ट्विटरवर सोनालीचा व्हिडीओ रिट्विट करताना आपली बाजू मांडली. तिने लिहिले की, 'तुम्ही जे काही बोललात ते अत्यंत असंवेदनशील आहे. आजच्या आधुनिक महिलांना तुम्ही आळशी म्हणत आहात.. आजच्या तरुणी केवळ त्यांचे कामच नाही, तर त्यासोबत त्यांचे घरही सांभाळत आहेत! अशा परिस्थितीत आपला नवरा चांगले पैसे कमावणारा असावा, असे तिला वाटत असेल तर त्यात गैर काय आहे. शतकानुशतके पुरुषांनी स्त्रियांना केवळ मुले जन्माला घालण्याचे यंत्र मानले आहे आणि लग्नाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हुंडा. मुलींनो, विचारण्यास किंवा मागणी करण्यास अजिबात घाबरू नका.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणाली आहे की, 'भारतात अनेक मुली आळशी असतात, त्यांना असा बॉयफ्रेंड किंवा नवरा हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी आहे, ज्याच्याकडे घर आहे... ज्याला पगार मिळणार याची खात्री आहे. मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे की, तुम्ही तुमच्या घरात अशा महिला निर्माण करा, ज्या सक्षम असतील. ज्या स्वत:साठी कमवू शकतील.... ज्या प्रत्येक खर्चात अर्धा वाटा उचलू शकतील.’

IPL_Entry_Point

विभाग