Urfi Javed Death Threat: मनोरंजन विश्वाची कॉंट्रोव्हर्सी क्वीन उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, कधीकधी तिच्या फॅशनमुळे ती ट्रोल देखील होत असते. मात्र, यावेळी तिला फॅशन चांगलीच महागात पडली आहे. यावेळी देखील असेच काहीसे घडले. दोन दिवसांपूर्वी उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती 'भूल भुलैया'च्या 'छोटा पंडित' लूकमध्ये दिसली होती. आता उर्फीला ही स्टाईल कॉपी करणे चांगलेच महागात पडले आहे. या फॅशनमुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. छोटा पंडितचा हा लूक कॉपी केल्यामुळे अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे.
उर्फी जावेदने २९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी इन्स्टाग्रामवर तिचा हॅलोवीन पार्टीचा लूक शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने केशरी आणि लाल रंगाचे धोतर घातले होते. तर, चेहऱ्यावर लाल रंग लावला होता. गळ्यात फुलांची माळ घातली होती आणि कानावर अगरबत्ती लावली होती. अभिनेता राजपाल यादव याने 'भूल भुलैया' या चित्रपटात साकारलेला 'छोटा पंडित' असाच दिसत होता. या लूकला रिक्रिएट केल्यानंतर अभिनेत्रीला मेलवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. इतकंच नाही, तर अभिनेत्रीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
उर्फीने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. पण, यावर तिने अद्याप आपलू प्रतिक्रिया दिलेली नाही. एका व्यक्तीने उर्फीला मेल करून लिहिले की, 'तुम्ही अपलोड केलेला व्हिडीओ तत्काळ डिलीट करा, नाहीतर तुम्हाला जीवे मारायला वेळ लागणार नाही.' तर, दुसर्या एका व्यक्तीने मेल केलाय की, 'उर्फी जावेद आमच्या हिंदू धर्माची बदनामी करत आहे. भर चौकात तुला गोळ्या घालू.' असे म्हणत शिवराळ भाषेत धमकी दिली आहे.
उर्फी जावेदला अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिला अशा धमक्या मिळल्या होत्या. यावर्षीचा काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या कार्यालयातून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तिच्या कपड्यांवरूनच हा वाद झाला होता, त्यानंतर तिला फोनवरून धमकी मिळाली होती.
संबंधित बातम्या