कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर, उर्फी जावेद कशापासून आपला आऊटफिट तयार करेल याचा काही नेम नाही. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचा फॅशन सेन्स पाहून भलेभले लोक हैराण होतात. आता उर्फीने धक्कादायक खुलासा केला आहे.
नुकताच उर्फीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उर्फी मुंबईहून गोव्याला निघाली होती. ती फ्लाइटमधून जात असताना तिच्यासोबत काही मुलांनी गैरवर्तन केले आहे. याबाबत उर्फीने स्वत: माहिती दिली आहे. तिने दिलेली माहिती ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
उर्फी २० जुलै रोजी मुंबई ते गोवा विमानाने प्रवास करत होती. त्यावेळी घडलेला प्रकार तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत सांगितला आहे. 'मी काल मुंबईहून गोव्याला जात असताना मला शोषणाला सामोरे जावे लागले. व्हिडीओमध्ये ही मुले घाणेरडे बोलत होते आणि विनयभंग करत होते. ते माझे नाव घेत होते. मी त्यांना अडवले तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की, त्याचे मित्र नशेत आहेत. मद्यधुंद असल्यामुळे ते असे आहेत. पण दारू पिऊन स्त्रीशी गैरवर्तन करण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही. मी एक सार्वजनिक व्यक्ती आहे, सार्वजनिक मालमत्ता नाही' असे उर्फीने म्हटले आहे.
उर्फीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच एकता कपूरच्या 'एलएसडी 2' या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या