सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर उर्फीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तिने शिंपल्यांपासून ब्रा बनवल्याचे दिसत आहे.
उर्फीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरच शेअर करताना दिसते. नुकताच तिने शिंपल्यांपासून ब्रा बनवली आहे. उर्फीने शिंपल्यांना गुलाबी रंग दिली आहे आणि त्यापासून ब्रा बनवली आहे. तसेच गळ्यात मोती आणि शिंपल्याचा एक नेकसेल घातला आहे. त्यावर तिने पांढऱ्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान केले आहे. तिने या लूकमध्ये फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट केली आहे.
वाचा: लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर सिनेमा येणार, पोस्टर प्रदर्शित
सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल होताच अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'ही तर हद्दच झाली' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'उर्फी काहीही करु शकते' असे म्हणत टीका केली आहे. तिसऱ्या यूजरने 'ही काय पद्धत आहे. असे कपडे घालून तू बाहेर तरी कशी जाऊ शकतेस' अशी कमेंट केली आहे.
उर्फीची फॅशन शैली हटके असली, तरी लोकांचे लक्ष वेधून घेण्यात ती यशस्वी ठरते. मात्र, सध्या याच फॅशन शैलीमुळे उर्फी जावेद ट्रोल होताना दिसत आहे. उर्फी जावेद अनेक मालिकांमधून छोट्या छोट्या भूमिका साकारताना दिसली. मात्र, ‘बिग बॉस ओटीटी’च्या माधमातून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
संबंधित बातम्या