सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचा फॅशन सेन्स पाहून भलेभले लोक हैराण होतात. आता उर्फीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोंमध्ये तिचे ओठ सुजलेले दिसत आहेत.
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिप फिलर करतानाचा प्रवास सांगितला आहे. 'मी तुमच्यासोबत माझ्या लिप फिलरचा प्रवास शेअर करत आहे. मी वयाच्या १८व्या वर्षापासून लिप फिलर्स करत आहे, तेव्हा माझ्याकडे इतके पैसे नव्हते. मला नेहमी वाटायचे की माझे ओठ हे अतिशय पातळ आहेत आणि मला ते फुगलेले हवे होते. मी एका डॉक्टरकडे गेली आणि ते कमी पैशात करण्याचा निर्णय घेतला. आता माझे ओढ असे दिसत आहेत. ही आतापर्यंतची माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी गोष्ट ठरली आहे' असे उर्फी मिळाली.
पुढे ती म्हणाली, 'मी लोकांना हे करु नका असे म्हणणार नाही पण हे करताना काळजी घ्या असे मी सांगेन. मला आणखी बरेच लिप फिलर करायचे आहेत. माझ्या चेहऱ्याला किती चांगले दिसतात हे मला पाहायचे आहे. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी पहिले अभ्यास करा आणि मगच जा असा माझा सल्ला आहे. तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा किंवा बॉडीचा एखादा भाग आवडत नसेल तर त्याचा राग करु नका किंवा लाज वाटू देऊ नका. चांगल्या डॉक्टरकडून सर्जरी करुन घ्या.'
उर्फीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच एकता कपूरच्या 'एलएसडी 2' या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या