सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर उर्फीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती एका मुलीला किस करताना दिसत आहे. आता ही मुलगी नेमकी कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
उर्फी जावेद ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जरी चर्चेत असली तरीही ती नेमकी कोणाला डेट करत आहे, याबद्दल कधी खुलासा होऊ शकला नाही. मात्र, नुकताच उर्फी जावेद हिचा एका फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहून आता अनेक चर्चा या रंगताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये उर्फी तिची जवळची मैत्रीण काजोलसोबत दिसत आहे. त्या दोघी सतत एकत्र दिसतात. नुकताच उर्फी काजोलसोबत डिनरला गेली होती. त्यांचा किस करतानाचा फोटो व्हायरल झाल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी उर्फीने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मुंबईमध्ये आल्यावर तिच्याकडे राहण्यासाठी घर देखील नव्हते. तिला राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. अक्षरश: रस्त्यावर झोपण्याची वेळ आली होती. त्यावेळी तिला काजोलने मदत केली होती. हळूहळू उर्फीने मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिच्या मालिका तुफान हिट ठरल्या होत्या. पण बिग बॉस ओटीटीने उर्फीला खरी ओळख मिळवून दिली.
संबंधित बातम्या