Urfi Javed: 'भारताचे नाव खराब करत आहेस', एअरपोर्टवर उर्फीला कपड्यामुळे सुनावले
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: 'भारताचे नाव खराब करत आहेस', एअरपोर्टवर उर्फीला कपड्यामुळे सुनावले

Urfi Javed: 'भारताचे नाव खराब करत आहेस', एअरपोर्टवर उर्फीला कपड्यामुळे सुनावले

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Jul 24, 2023 07:25 PM IST

Urfi Javed: उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उर्फीला विमानतळावर कपड्यांवरुन सुनावत असल्याचे दिसत आहे.

Urfi Javed
Urfi Javed

सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीला एक व्यक्ती कपड्यांवरुन सुनावत आहे. 'तू भारताचे नाव खराब करत आहेस' असे त्या व्यक्तीने म्हटले आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये उर्फीने लाँग असा प्रिंटेड बॅकलेस वनपिस घातला आहे. या वनपिसमध्ये उर्फी अतिशय हॉट दिसत आहे. तिचा हा लूकपाहून विमानतळावरील एक व्यक्ती चिडली आहे. ती व्यक्ती उर्फीला 'तू भारताचे नाव खराब करत आहेस' असे बोलताना दिसत आहे. ते ऐकून उर्फी देखील शांत बसली नाही. तिने त्या व्यक्तीला 'तुझ्या बापाचे काही जाते का? नाही जात ना तुझ्या बापाचे काही.. मग जा तुझे काम कर' असे म्हटले आहे.

उर्फी आणि त्या व्यक्तीमध्ये जोरदार भाडण होते. विमानतळावर आजूबाजूला असणारे लोक जमा होता आणि गर्दी दिसू लागते. तेवढ्यात उर्फीची बहिण तेथे येते आणि त्याला तुम्ही तुमचे काम करा असे म्हणते. त्यानंतर ती व्यक्ती तेथून निघून जाते.

Whats_app_banner