मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा संतापली उर्फी जावेद! ट्वीट करत म्हणाली...

Urfi Javed: चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा संतापली उर्फी जावेद! ट्वीट करत म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 14, 2023 09:18 AM IST

Urfi Javed-Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शीतल म्हात्रे यांना पाठिंबा देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, चित्रा वाघ यांच्या या भूमिकेवरून उर्फी जावेद हिने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Urfi Javed-Chitra Wagh
Urfi Javed-Chitra Wagh

Urfi Javed-Chitra Wagh : मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादाने आता नवे वळण घेतले आहे. पुन्हा एकदा उर्फी जावेद हिने एक ट्वीट करत चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. शीतल म्हात्रे प्रकरणात एक ट्वीट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. या प्रकरणात आता उर्फी जावेद हिने देखील उडी घेतली आहे. उर्फी जावेद हिने देखील एक ट्वीट करत चित्रा वाघ यांना सुनावले आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शीतल म्हात्रे यांना पाठिंबा देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, चित्रा वाघ यांच्या या भूमिकेवरून उर्फी जावेद हिने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शीतल…..तू लढ, आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शीतल पुरता मर्यादीत नाहीचं, राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. @MumbaiPolice ना आवाहन आहे, या हरामखोरांना सोडू नकाचं. पण यांचा करविता धनी कोण आहे, त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा.’

चित्रा वाघ यांच्या याच ट्वीटला रिट्वीट करत उर्फी जावेद हिने देखील बोचरी टीका केली आहे. उर्फी म्हणाली की, ‘ती वेळ विसरलात का? जेव्हा माझ्या कपड्यांमुळे, माझ्या चारित्र्यावर बोट दाखवलं होतं. यावरूनच मला तुरुंगात पाठवण्याची मागणी देखील केली होती. इतकंच नाही, तर माझं डोकं फोडण्याची उघड धमकीही देण्यात आली. वाह वाह वाह. हिपोक्रसीच्या पण काहीतरी मर्यादा असतात, हे कोणी तरी या बाईला सांगा.'

उर्फी जावेद तिच्या बोल्डव विचित्र कपड्यामुळे कायम चर्चेत असते. या हॉट व तोकड्या कपड्यांनीच उर्फीला अनेकदा अडचणीत आणलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. उर्फीने मुंबई व महाराष्ट्रात हा नंगानाच सुरू ठेवल्यास तिचे थोबाड फोडेन, अशी धमकीच चित्रा वाघ यांनी दिली होती. या धमकीनंतर उर्फीच्या हॉट कपड्यांप्रमाणे उर्फी आणि चित्रा वाघ यांच प्रकरणही प्रचंड तापलं होतं.

WhatsApp channel

विभाग