कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर, उर्फी जावेद कशापासून आपला आऊटफिट तयार करेल याचा काही नेम नाही. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचा फॅशन सेन्स पाहून भलेभले लोक हैराण होतात. आता उर्फीने चक्क कॅमेरासमोरच कपडे बदलले आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.
बॉलिवूड फोटोग्राफर विरल भय्यानीने उर्फीचा एक व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी कारमधून खाली उतरताना दिसत आहे. त्यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यानंतर काही लोक तेथे जमा होतात आणि उर्फीला ड्रेस बदलण्यास मदत करतात. उर्फीचा काळ्या रंगाचा गाऊन अचानक फ्लोरल लॉंग गाऊनमध्ये बदलतो. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत झाले आहेत.
उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है' अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने 'हा काय प्रकार आहे... सस्ववाला मेटगाला' अशी कमेंट केलीआहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
उर्फीची फॅशन शैली हटके असली, तरी लोकांचे लक्ष वेधून घेण्यात ती यशस्वी ठरते. मात्र, सध्या याच फॅशन शैलीमुळे उर्फी जावेद ट्रोल होताना दिसत आहे. उर्फी जावेद अनेक मालिकांमधून छोट्या छोट्या भूमिका साकारताना दिसली. मात्र, ‘बिग बॉस ओटीटी’च्या माधमातून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
संबंधित बातम्या