मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: 'आज देवही खूश असणार', उर्फीचे कपडे पाहून नेटकऱ्याची कमेंट

Urfi Javed: 'आज देवही खूश असणार', उर्फीचे कपडे पाहून नेटकऱ्याची कमेंट

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 05, 2022 12:27 PM IST

Urfi Javed Dress: उर्फी सतत तिच्या अतरंगी ड्रेसमुळे चर्चेत असते. पण यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांची मने जिंकली आहेत.

उर्फी जावेद
उर्फी जावेद (HT)

आपल्या हटके आणि अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. उर्फी तिच्या अभिनयापेक्षा अतरंगी कपड्यांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ती जितक्या कमी कपड्यांचा वापर करता येईल तितका कमी वापर करत असते. तिचे फोटोग्राफर्ससोबतचे वागणेही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र कपड्यांमुळे उर्फीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता उर्फीचा एक नवा लूक समोर आला आहे. तिचा हा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर उर्फीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील उर्फीचा लूक पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण यावेळी उर्फीने ब्रायडल लूकमध्ये फोटोशूट केले आहे. ती या लूकमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
वाचा : प्राजक्ता माळीचे घर आतुन पाहिलेत का? पाहा व्हिडीओ

उर्फीने गुलाबी आणि गोल्डन रंगाचा घागरा घातला आहे. त्यावर गळ्यात मोठा नेकलेस परिधान केला आहे. हातात बांगड्या घातल्या आहेत. या लूकमध्ये उर्फी अतिशय सुंदर दिसत आहे. व्हिडीओमध्ये उर्फी घागरा घालून डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने तर, 'आज देवपण आनंदी असेल कारण अखेर उर्फी सुधारली. आज तू छान दिसत आहेस' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने, 'क्लासिक आउटफिटमध्ये तू सुंदर दिसत आहेस' असे म्हटले आहे.

उर्फी ही सतत तिच्या विचित्र लूकमुळे चर्चेत असते. कधी अतरंगी कपडे परिधान करते आणि त्यावर हटके लिपस्टिक लावते. ती सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. बऱ्याचदा नेटकरी तिला ट्रोल करतात. पण उर्फी त्यांना दुर्लक्ष करत असते.

IPL_Entry_Point

विभाग