निवडणुकीच्या तोंडावर 'वर्गमंत्री' सीरिजच्या ट्रेलरची चर्चा, नेमकं काय पाहायला मिळणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  निवडणुकीच्या तोंडावर 'वर्गमंत्री' सीरिजच्या ट्रेलरची चर्चा, नेमकं काय पाहायला मिळणार?

निवडणुकीच्या तोंडावर 'वर्गमंत्री' सीरिजच्या ट्रेलरची चर्चा, नेमकं काय पाहायला मिळणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 06, 2024 11:25 AM IST

Vargamantri Web Series Trailer: सध्या सगळीकडे ‘वर्गमंत्री’ या वेब सीरिजची चर्चा रंगली आहे. या सीरिजच्या माध्यमातून एक वेगळा विषय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Vargamantri
Vargamantri

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार हे स्टार प्रचारक म्हणून समोर येत आहेत. अशातच एका चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, एका वेब सीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे. या सीरिजचे नाव 'वर्गमंत्री' असे आहे. या सीरिजचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वजण कौतुक करत आहेत. तसेच या सीरिजची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

काय आहे सीरिजचा टीझर?

'वर्गमंत्री' सीरिजच्या ट्रेलरमध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नागरिकशास्त्राचे धडे मिळावेत, लोकशाही प्रक्रिया समजावी या साठी शाळांमध्ये निवडणूक घेतली जाते. अशीच वर्गमंत्री पदासाठीची निवडणूक घेण्याचे शाळेत ठरवले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांची उमेदवारी, अर्ज भरणे, प्रचार, मतदान अशा सर्व प्रक्रिया पार पाडताना उडणारी धमाल वर्गमंत्री या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. ट्रेलरमधूनच ही सीरिज मनोरंजक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मराठी वेब विश्वात खास रे टीव्हीची वेगळी ओळख आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरचा अस्सल मराठी कंटेट खास रे टीव्हीनं आजवर सादर केला आहे. त्यामुळे आता वेब सीरिजच्या क्षेत्रातही वर्गमंत्रीसारखी खास निर्मिती लक्षवेधी ठरेल यात शंका नाही.

कोणते कलाकार दिसणार?

'वर्गमंत्री' सीरिजमध्ये अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट दिसणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. संजय श्रीधर कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सीरिजचं लेखन संजय, अजिंक्य म्हाडगूत, संकेत हेगाणा, प्रवीण कांबळे यांचं आहे.
वाचा: सनी लिओनीने केले दुसऱ्यांदा लग्न, मुलांच्या साक्षीने घेतली शेवटपर्यंत साथ निभावण्याची शपथ

कधी प्रदर्शित होणार सीरिज?

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता शाळेतील वर्गमंत्री निवडणुकीचा कल्ला होणार आहे. ८ नोव्हेंबरपासून ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजची निर्मिती खास रे टीव्हीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मराठी वेब विश्वात खास रे टीव्हीची वेगळी ओळख आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरचा अस्सल मराठी कंटेट खास रे टीव्हीनं आजवर सादर केला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये या सीरिजची उत्सुकता वाढली आहे.

Whats_app_banner