प्रेक्षक नेहमी धकाधकीच्या दुनियेपासून थोडा आनंद मिळवण्यासाठी काही निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात. तर काही जण घरात बसून मनसोक्त हसायला मिळेल असे कार्यक्रम पाहात असतात. छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा या कॉमेडी शो म्हणून पाहिला जातो. आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मराठीमध्ये एक नवा स्टँडअप कॉमेडी शो सुरू होणार आहे. या शोचे नाव ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ असे आहे. आता हा शो कधी आणि कुठे पाहाता येणार चला जाणून घेऊया...
‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा एक नवीन मराठी स्टँडअप कॉमेडी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये मराठी मनोरंजन विश्वातील काही उत्कृष्ट लेखक प्रथमच स्टेजवर स्टँडअप कॉमेडी सादर करणार आहेत. चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत या लेखकांनी पूर्वी अनेक मनोरंजक कथा लिहून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता मात्र हे लेखक प्रत्यक्ष स्टेजवर येऊन आपल्या विनोदी किस्से सांगून प्रेक्षकांना हसवणार आहेत. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या शोचे सूत्रसंचालन करून हास्ययात्रेला चारचांद लावणार आहे. तिच्या अनोख्या अंदाजाने व सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत येईल.
वाचा: बिग बी- शाहरुख पेक्षा जास्त हिट सिनेमे, तरीही या अभिनेत्याला सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली नाही
प्रेक्षकांना हसवण्याची जबाबदारी घेऊन लेखक आता कॅमेरासमोर येणार आहेत आणि त्यांच्या लेखणीप्रमाणेच त्यांची स्टेजवरील उपस्थितीदेखील प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा शो फक्त एक कॉमेडी शो नसून लेखकांच्या कलागुणांची एक मजेशीर सफर असणार आहे. हा धमाकेदार कॉमेडी शो एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या