Natak: नाटक पाहायचा विचार करताय? मग 'पाहिले न मी तुला' हे नवे नाटक नक्की पाहा, या दिवशी येणार रंगभूमीवर-upcoming marathi natak pahile na me tula ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Natak: नाटक पाहायचा विचार करताय? मग 'पाहिले न मी तुला' हे नवे नाटक नक्की पाहा, या दिवशी येणार रंगभूमीवर

Natak: नाटक पाहायचा विचार करताय? मग 'पाहिले न मी तुला' हे नवे नाटक नक्की पाहा, या दिवशी येणार रंगभूमीवर

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 19, 2024 03:31 PM IST

Marathi Natak: सध्या रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटके येताना दिसत आहेत. त्यामध्ये 'पाहिले न मी तुला' या नाटकाचा देखील समावेश आहे. हे नाटक रंगभूमीवर कधी येणार चला जाणून घेऊया...

Pahile na me tula
Pahile na me tula

रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार हे रंगभूमीवर स्वत:ला एका वेगळा रुपात सादर करतात. प्रेक्षक देखील तितक्याच आवडीने नाटक पाहायला जातात. आता 'पाहिले न मी तुला' हे नवे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे नाटक रंगभूमीवर कधी येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असल्याचे दिसत आहे. चला जाणून घेऊया...

आपल्यातील सळसळत्या ऊर्जेचं दर्शन घडवत कोकणाचा ‘झिल’ अंशुमन विचारे जळगावचा ‘जाळंधुर’ लेक हेमंत पाटील या दोन्ही अतरंगी कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने आजवर रसिकांचं मनोरंजन केलं. आता 'पाहिले न मी तुला' या नाटकातून हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला' हे नवंकोर नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे.

काय पाहायला मिळणार?

सहवासातल्या प्रेमाचे वेगवेगळे पैलू मांडणाऱ्या या नाटकात अंशुमन आजवरची सर्वात वेगळी भूमिका करणार आहे. अंशुमन विचारे, हेमंत पाटील यांच्यासोबाबत सुवेधा देसाई या नाटकात आहे. सुमुख चित्र चे कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. सूत्रधार दिनू पेडणेकर आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे. ‘पाहिले न मी तुला' नाटकाच्या निमित्ताने मला आणि हेमंतला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. याआधी आम्ही कधी एकत्र काम केलेलं नाही. माणूस म्हणून आणि ज कलाकार म्हणून हेमंत उत्तम आहे. त्यामुळे आमचं छान ट्यूनिंग जुळून आलं. निखळ मनोरंजनसोबत आमच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट प्रेक्षकांना या नाटकातून मिळेल असा विश्वास अंशुमन यांनी व्यक्त केला.
वाचा: कल्की २८९८ एडी 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार

कधी येणार रंगभूमीवर

'पाहिले न मी तुला' या नाटकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा वेध यातून घेतला आहे. ‘सुमुख चित्र’ ही निर्मिती संस्था आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर आणणार आहे. २२ ऑगस्टपासून ‘पाहिले न मी तुला' नाटकाच्या शुभारंभाचे रंगणार आहेत. गुरुवार २२ ऑगस्टला बालगंधर्व पुणे रात्री साडे नऊ वाजता, शुक्रवार २३ ऑगस्ट रामकृष्ण मोरे नाट्यगृह रात्री साडे नऊ वाजता, शनिवार २४ ऑगस्ट संध्याकाळी चार वाजता ,शुक्रवार ३० ऑगस्ट विष्णुदास भावे वाशी संध्याकाळी वाजता नाटकाचे प्रयॊग संपन्न होणार आहे.

विभाग