बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या 'द्विधा' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या 'द्विधा' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या 'द्विधा' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jun 17, 2024 01:08 PM IST

रविवारी 'फादर्स डे' साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणारा 'द्विधा' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. त्यासोबतच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

dwidha teaser: 'द्विधा' चित्रपटाचा टीझर
dwidha teaser: 'द्विधा' चित्रपटाचा टीझर

प्रत्येकाच्या आयुष्यात एक सुपरहिरो असतोच. विशेष करुन हा सुपरहिरो अनेकदा त्यांचे वडीलच असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये खांद्यावर विश्वासाचा हात असणारे वडील हे सर्वांचा आयुष्यात महत्त्वाचे असतात. यावरच आधारित एक नवा चित्रपट 'द्विधा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविवारी 'फादर्स डे' निमित्ताने या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

काय आहे टीझर?

हृदयस्पर्शी संगीत आणि कॅनव्हासवर रंगवलेल्या चित्रांसारखी दिसणारी दृश्ये प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण करत आहे. वडील आणि मुलींमधील चिरस्थायी प्रेम आणि हळवे संबंध चित्रपटातून लवकरच पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याविषयी देखील उत्सुकता वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: ‘शरद पवार माझे आवडते नेते, तीन मिनिटात त्यांनी माझे काम केले’, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे सतीश पुळेकर यांच्या 'द्विधा' या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर १६ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाला आहे. दिर्घकाळानंतर सतीश पुळेकर 'द्विधा' चित्रपटातून प्रमुख भूमिकेत येत असल्याचे दिसत आहेत. फादर्स डेच्या निमित्ताने बाप आणि लेक यांच्यातील नाजूक आणि गुंतागुंतीच्या नात्याचा जणू वेध घेणारा चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम करत आहे. या चित्रपटात वडील आणि मुली मधील भावनिक बंधांच एक मार्मिक आणि हृदयस्पर्शी नातं असल्याचं दिसत आहे.
वाचा: बॉक्स ऑफिसवर शर्वरी वाघची जादू, 'मुंज्या' चित्रपटाने आठ दिवसात कमावले इतके कोटी!

वाचा: संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले

कोणते कलाकार दिसणार?

भावनिक दृष्ट्या अनुनाद कथाकथनाचा अनुभव असणारे निलेश नाईक यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तसेच विदुला नाईक यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर यांच्यासोबत आकर्षक आणि अष्टपैलू अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रचंड प्रतिभावान अभिनेत्री मानसी कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेटफ्लिक्स आणि इतर अनेक चित्रपट, वेब सिरीजसाठी आपलं संगीत देणारे निलोत्पल बोरा यांनी चित्रपटास संगीतबद्ध केले असून मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे सर्वजण ट्रेलरची वाट पाहात आहेत.

Whats_app_banner