मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ranndhurandhar: शत्रूला भयभीत करून सोडणाऱ्या मराठा योद्धांच्या उदयाची गाथा; 'रणधुरंदर'मधून उलगडणार इतिहास!

Ranndhurandhar: शत्रूला भयभीत करून सोडणाऱ्या मराठा योद्धांच्या उदयाची गाथा; 'रणधुरंदर'मधून उलगडणार इतिहास!

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 03, 2024 01:38 PM IST

Ranndhurandhar poster: नुकताच एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्टर सध्या चर्चेत आहे.

Ranndhurandhar poster
Ranndhurandhar poster

Upcoming historical movie: सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आता एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव 'रणधुरंदर' असे आहे. या चित्रपटात मराठा योद्धांच्या उदयाची गाथा दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट २०२५मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा 'रणधुरंदर' हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी भाषेत प्रदर्शित होणार आहे. भाग्यश्री जाधव, अमित भानुशाली, अनुप अशोक देशपांडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. या चित्रपटात कलाकार कोण असणार, याबाबत सध्या तरी गोपनीयता आहे. पॅन इंडिया असलेला हा चित्रपट भव्यदिव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: मी १८ वर्षांची असताना...; दिशा पटाणीने करण जोहर विषयी केलेले वक्तव्य चर्चेत

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, "ही कहाणी वीर योद्धांची आहे, लढाईत शत्रूला भयभीत करून सोडणाऱ्या रणधुरंधराची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून याची भव्यता तुम्हाला चित्रपट पाहूनच जाणवेल."
वाचा: नयनतारा पतीपासून विभक्त होणार? सोशल मीडियावरूनही अनफॉलो केल्याची चर्चा

श्रेयश जाधव यांनी यापूर्वी ‘मी पण सचिन’, ‘फकाट’ असे जबरदस्त चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. लवकरच त्यांचे ‘डंका हरिनामाचा’, ‘जंतर मंतर छू मंतर’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
वाचा: ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याच्या नावावर पैसे उकळण्याचा प्रकार; पोस्ट लिहित अमित भानुशाली म्हणाला...

श्रेयस जाधवच्या कामाविषयी

यापूर्वी दिग्दर्शक श्रेयस जाधवचा फकाट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रसिका सुनील, किरण गायकवाड, हेमंत ढोमे, अविनाश नारकर, अनुजा साठे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

मराठी ऐतिहासिक सिनेमे

आजकाल मराठीमध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये पावनखिंड, हरहर महादेव, रावरंभा, तान्हाजी, राजमाता जिजाऊ, सरसेनापती हंभीरराव या चित्रपटांचा समावेश आहे. आता प्रेक्षकांमध्ये 'रणधुरंदर' या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळते.

IPL_Entry_Point

विभाग