मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Historical Marathi Movie: शिवबांची तळपती तलवार, 'बहिर्जी नाईक' यांच्या जीवनावर येणार सिनेमा

Historical Marathi Movie: शिवबांची तळपती तलवार, 'बहिर्जी नाईक' यांच्या जीवनावर येणार सिनेमा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 16, 2024 02:16 PM IST

Bahirji Naik Movie:'बहिर्जी' या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Bahirji Naik Movie
Bahirji Naik Movie

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर अनेक ऐतिहासिक चित्रपट येताना दिसत आहेत. आता यामध्ये शिवबांची तळपती तलवार असणारे बहिर्जी नाईक यांच्या आयष्यावर चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'बहिर्जी नाईक' असे असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरवर सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय... बहिर्जी म्हंजे शिवबाची तळपती तलवार हाय... अशी टॅगलाइन लिहिली आहे.

खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये माती आड लपलेल्या अंगारसारखे धगधगते काम करणारे बहिर्जी नाईक इतिहासात फारसे दिसलेही नाही. त्यांचीच यशोगाथा 'बहिर्जी' या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. 'बहिर्जी'च्या मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली असून चित्रपटात कलाकार कोण असतील आणि हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस कधी येईल, याविषयी सुद्धा प्रेक्षकांमध्ये कमालीचे कुतूहल आहे.
वाचा: अन् हृतिकने मारली एक्स वाइफला मिठी, सर्वजण बसले पाहात

'बहिर्जी' या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जाधवने केले आहे. हा चित्रपटात बहिर्जी यांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चित्रपटाविषयी बोलताना राहुल म्हणाला, "छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे आज आपल्यासाठी हिमानगाचे टोक आहे. बऱ्याच घटना काळाच्या उदरात अज्ञात आहेत. अशा काळात महाराजांची प्रत्येक योजना यशस्वी होण्यासाठी त्या योजनेचा पाया बनून राहिलेले बहिर्जी नाईक हे जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ठरतात. त्यांच्या योजनाच इतक्या गुप्त असायच्या की, त्यांचा मागोवा घेणेसुद्धा शक्य नव्हते. मात्र अशा काळात स्वराज्य हे स्वप्न या मातीत रुजवणारे शिवराय आणि या स्वप्नासाठी जीव उधळायला सुद्धा तत्पर असणारे मावळे या साऱ्यांचे अवलोकन केले तर त्यातूनच बहिर्जी नावाची वीण हळुवार उलगडत जाते. हेच दाखवण्याचा प्रयत्न 'बहिर्जी' या चित्रपटातून आम्ही केला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा वस्तुनिष्ठ वेध घेऊनच या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. सध्या या चित्रपटाचे पहिले पुष्प भेटीला आले असून लवकरच याबाबतचे सारे चित्र स्पष्ट करू."

WhatsApp channel

विभाग