छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘द कपिल शर्मा’ शो पाहिला जात होता. या शोमधील ‘पिंकी बुआ’ म्हणजेच अभिनेत्री उपासना सिंहने तर सर्वांची मने जिंकली होती. आज या शोमुळे तिचे लाखो चाहते आहेत. यापूर्वी उपासनाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. २९ जून रोजी उपासनाचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
उपासना सिंहचा जन्म पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. १९९७मध्ये प्रदर्शित झालेल्या श्रीदेवी आणि अनिल कपूरचा सुपरहिट चित्रपट ‘जुदाई’मधून उपासनाला लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटातील तिचा ‘अब्बा-डब्बा-जब्बा’ हा एक संवाद खूप गाजला होता. अभिनेत्री उपासना सिंहने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये सहायक भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर आपली अमीट छाप सोडली आहे. दुसरीकडे, उपासना सिंह तिच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी देखील ओळखली जाते.
वाचा: लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानी यांची खास तयारी, खरेदी केलेल्या नव्या साडीची किंमत माहिती आहे का?
उपासनासाठी तिची अभिनय कारकीर्द घडवणे सोपे नव्हते. ती खूप लहान असताना तिला हृदयाशी संबंधित समस्या होती. तिच्या हृदयाला एक छिद्र होते. त्यामुळे ती शरीराला जास्त थकवणारे काम करू शकत नव्हती. तिला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती. पण, हृदयाला असलेल्या छिद्रामुळे ती नाचताना बेशुद्ध व्हायची. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ या लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये उपासना सिंह कपिल शर्माच्या आत्याच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेतून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
वाचा: 'प्रेमासाठी लढणार', ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन
लहान मुलांचा आवडता शो ‘सोनपरी’मध्ये उपासना सिंहने नकारात्मक भूमिका साकारली होती. या शोमध्ये तिने ‘काली परी’ बनून सगळ्यांनाच घाबरवले होते. या शोने तिला घराघरात एक वेगळी ओळख मिळवून दिली. उपसानाने ‘मायका’, ‘राजा की आयेगी बारात’, ‘ढाबा जंक्शन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. या सर्वच मालिकांमध्ये उपासनाच्या अभिनयाची वाहवा झाली होती.
वाचा: मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का
उपासना जेव्हा ती सात-आठ वर्षांची होती, तेव्हापासूनच तिला नृत्य शिकण्याची खूप आवड होती. पण, जेव्हाही ती डान्स करायची तेव्हा, ती बेशुद्ध व्हायची. यानंतर जेव्हा तिच्या चाचण्या झाल्या, तेव्हा तिच्या हृदयात छिद्र असल्याचे समोर आले. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनीही हात वर केले होते. त्यांनी तिला लवकरात लवकर ऑपरेशन करण्याचा सल्लाही दिला होता. यानंतर पीजीआय चंदीगड येथे तिचे ऑपरेशन पार पडले.
संबंधित बातम्या