उर्फी जावेद विकणार तिचा ड्रेस! किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, 'इतक्या पैशामध्ये तर ३ बीएचके घर येईल'
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  उर्फी जावेद विकणार तिचा ड्रेस! किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, 'इतक्या पैशामध्ये तर ३ बीएचके घर येईल'

उर्फी जावेद विकणार तिचा ड्रेस! किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, 'इतक्या पैशामध्ये तर ३ बीएचके घर येईल'

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 01, 2024 08:20 AM IST

Uorfi javed: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. आता उर्फी तिचा एक ड्रेस विकत आहे. या ड्रेसची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

उर्फी जावेद
उर्फी जावेद

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी कपड्यांमुळे तिला ट्रोल केले जाते तर कधी कौतुक केले जाते. आता उर्फी जावेद तिचा एक ड्रेस विकत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयी माहिती दिली आहे. उर्फीने लिहिलेल्या ड्रेसची किंमत जाणून अनेक जण तिला ट्रोल करत आहेत. उर्फीच्या या ड्रेसची किंमत जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

उर्फी जावेद कोणता ड्रेस विकत आहे?

उर्फी जावेदने काही दिवसांपूर्वी काळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. या गाऊनमध्ये फुलपाखरे आणि पाने होती. उर्फीने हा ड्रेस परिधान केलेला एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. उर्फीने टाळ्या वाजवल्यावर ड्रेसमधली पाने उघडतात आणि त्यातून फुलपाखरे खाली उडतात असं या व्हिडिओत दिसत होतं. उर्फी आपला ड्रेस विकत आहे.

उर्फीने तिच्या ड्रेसची किंमत किती सांगितली?

उर्फीने या गाऊनमधील आपले दोन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यासोबत तिने कॅप्शन लिहिलं, 'हॅलो माय लव्हलीज, मी माझा बटरफ्लाय ड्रेस विकण्याचा निर्णय घेतला आहे जो अनेकांना आवडला होता. किंमत : फक्त ३६६९०००००० रुपये (फक्त ३ कोटी ६६ लाख ९९ हजार). ज्यांना ड्रेस आवडला आहे त्यांनी डीएम करा.'
वाचा: पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवतेय का? वाचा सध्या काय करते

सोशल मीडिया युजर्स काय म्हणतात?

उर्फीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, 'एवढ्या पैशामध्ये ३ बीएचके घर येईल.., हा ड्रेस खरेदी करु नका... तुझा ड्रेस तुझ्याकडेच ठेव.' दुसऱ्या एका यूजरने मी १५० रुपये देईन. ना तुमचं आणि ना माझं, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या. अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या युजरने कमेंट करत लिहिलं- हा ड्रेस वॉकिंग पानाचं दुकान आहे

Whats_app_banner