बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच मजा मस्ती करताना दिसतो. त्याचा खोडकर स्वभाव हा सर्वांनाच माहिती आहे. अक्षय कुमारसोबत काम करणारे कलाकार हे त्याच्या गमतीजमतीचे किस्से सांगत असतात. अक्षयने 'सिंह इज किंग' चित्रपटाचा सहकलाकार अभिनेता मनोज पाहवासोबत अतिशय खतरनाक प्रँक केला होता. मनोजने एका पॉडकास्टदरम्यान सांगितले की, अक्षय कुमारने नेहा धुपियासोबत मिळून असा प्रँक केला की मी माझे लग्न मोडले असते. पण सीमाला वेळेत कळाले की कोणीतरी मस्ती करत आहे.
मनोज पाहवा यांनी अक्षय कुमार शिस्तबद्ध असल्याबद्दल कौतुक केले आणि तो सेटवर किती मजामस्ती करतो हे देखील सांगितले आहे. मनोज यांनी 'हिंदी रश'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या वेळापत्रकादरम्यान त्याला त्याची पत्नी सीमा पाहवा चा फोन आला. अक्षयने मनोजच्या हातातून फोन घेतला आणि नेहा धुपियालाही प्रॅंकमध्ये सामील करून घेतलं. दोघेही मनोजसोबत एक अनोळखी महिला असल्याचे भासवू लागले.
मनोज म्हणाला, 'अक्षय सीमाशी मनोज म्हणून बोलला. मनोजची पत्नी सीमा फोनवर बोलत होती. अक्षयने हा फोन नेहा धुपियाला दिला. "ते बाथरूममध्ये आहेत," ती अनोळखी स्त्री म्हणून बोलली. मी म्हणालो, "तुम्ही मला मूर्ख बनवू शकत नाही." यामुळे संशय निर्माण झाला असता - सीमाला फोनवर कोणीतरी मुलगी आहे, तिथे काय चालले आहे असे वाटेल. पण मी अक्षयला सांगितले की हा विनोद आमच्यामध्ये चालणार नाही. कारण आमचे लग्न होऊन बराच काळ झाला आहे."
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
सीमा पाहवानेही मुलाखतीमध्ये अक्षयच्या मजामस्ती विषयी सांगितले. रक्षाबंधन या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे. 'चित्रपटाच्या सेटवर अक्षय म्हणाला होता की, आम्ही एकत्र जेवण करू. मी दुपारचे जेवण लंच एरियामध्ये घेऊन आलो. मी नेहमी घरी बनवलेले जेवण घेऊन जातो. सेटवर सगळ्यांना जलेबी- फाफडा दिला जात होता जो मी खाऊ शकत नव्हतो. माझा जेवणाचा डबा येताच. अक्षय आला आणि म्हणाला, हे मला दे आणि त्याने माझे सर्व दुपारचे जेवण संपवले. तो खूप खट्याळ आहे.'