मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Alia Bhatt Birthday: आलिया भट्टचा पहिला सिनेमा माहिती आहे का?

Alia Bhatt Birthday: आलिया भट्टचा पहिला सिनेमा माहिती आहे का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 15, 2024 08:29 AM IST

Alia Bhatt First Movie: वयाच्या ६व्या वर्षी आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यामुळे तिचा पहिला चित्रपट कोणता असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

आलिया भट्टचा पहिला सिनेमा माहिती आहे का?
आलिया भट्टचा पहिला सिनेमा माहिती आहे का? (Instagram/@AliaBhatt)

Happy Birthday Alia Bhatt: बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ओळखली जाते. आज १५ मार्च रोजी आलियाचा वाढदिवस आहे. आलिया तिचा ३१वा वाढदिवस मुलगी राहा आणि पती अभिनेता रणबीर कपूरसोबत साजरा करणार आहे. आज आलियाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयी काहील खास गोष्टी...

आलियाचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी मुंबईमध्ये झाला. आलियाचे वडील महेश भट्ट हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. तिची बहीण पूजा भट्ट देखील अभिनेत्री आहे. आलियाला लहानपणापासूनच बहिणीप्रमाणे अभिनेत्री व्हायचे होते. आलिया ही अभिनयाबरोबरच व्यावसाय देखील करते. तिची स्वत:ची एड-ए-मम्मा (Ed-e-Mamma) नावाची कपड्यांची कंपनी आहे.
वाचा: राम गोपाल वर्माची राजकारणात एण्ट्री, ‘या’ ठिकाणाहून लढणार निवडणूक

आलिया भट्टने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण हा आलियाचा पहिला चित्रपट नाही. यापूर्वी आलियाने वयाच्या ६व्या वर्षी देखील एका चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे नाव ‘संघर्ष’ असे आहे. हा आलियाचा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात आलिया भट्टने प्रिती झिंटाची बालपणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट १९९९मध्ये प्रदर्शित झाल होता.
वाचा: संतोष विरोधातील पुरावे सायलीच्या हाती लागणार! पण... 'ठरलं तर मग' पुढे काय घडणार?

आलियाच्या चित्रपटांविषयी

२०१२ मध्ये रिलीज झालेल्या स्टुडंट ऑफ द इयरमध्ये आलियाने प्रथमच मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. तिने डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली. गंगूबाई काठियावाडीमधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले.

आलियाची संपत्ती

आलिया ही अभिनेत्री, बिझनेसवुमन आणि निर्माती आहे. समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, आलिया ही ५५७ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. एका चित्रपटात काम करण्यासाठी आलिया कोट्यवधींचे मानधन घेते. तसेच ती काही ब्रँडचा अॅम्बेसिडर आहे. तिने काही जाहिरातींमध्ये काम केले आहे.

WhatsApp channel