Umesh Kamat Birthday : मराठीचा 'चॉकलेट बॉय'; उमेश कामतचे 'हे' गाजलेले चित्रपट कोणत्या ओटीटीवर बघाल?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Umesh Kamat Birthday : मराठीचा 'चॉकलेट बॉय'; उमेश कामतचे 'हे' गाजलेले चित्रपट कोणत्या ओटीटीवर बघाल?

Umesh Kamat Birthday : मराठीचा 'चॉकलेट बॉय'; उमेश कामतचे 'हे' गाजलेले चित्रपट कोणत्या ओटीटीवर बघाल?

Dec 12, 2024 11:12 AM IST

Umesh Kamat Famous Movies : आज (१२ डिसेंबर) उमेश कामत याचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने त्याचे गाजलेले चित्रपट कुठे बघता येतील यावर एक नजर टाकूया...

Umesh Kamat Birthday
Umesh Kamat Birthday

Umesh Kamat Famous Movies On OTT : मराठी मनोरंजन विश्वाचा 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता उमेश कामत याने आजवर अनेक चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. आज (१२ डिसेंबर) उमेश कामत याचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने त्याचे गाजलेले चित्रपट कुठे बघता येतील यावर एक नजर टाकूया...

उमेश कामत याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 'आभाळमाया', 'पडघम', 'ऋणानुबंध', 'वादळवाट', 'सारीपाट संसाराचा','असंभव', 'शुभं करोति', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' अशा अनेक मालिकांमध्ये त्याने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. यासोबतच त्याने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

टाईम प्लीज

‘टाईम प्लीज’ या चित्रपटात एका पती-पत्नीची लग्नानंतरची प्रेम कहाणी दाखवण्यात आली होती. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या चित्रपटात उमेश सोबत त्याची खरी पत्नी म्हणजेच अभिनेत्री प्रिया बापट ही मुख्य भूमिकेत दिसली होती. तर, अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे देखील या चित्रपटांमध्ये झळकले होते. एका लग्न झालेल्या जोडीच्या आयुष्यभोवती फिरणारी ही सुंदर आणि हलकी फुलकी प्रेम कथा सगळ्यांनाच आवडली होती. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.

लग्न पहावे करून

‘लग्न पहावे करून’ या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.  तर, या दोघांसोबत सिद्धार्थ चांदेकर आणि तेजश्री प्रधान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटांमध्ये लग्न संस्था म्हणजेच लग्न जमवणाऱ्या एका संस्थेची बांधणी एका हटके पद्धतीने करणाऱ्या जोडीची कथा दाखवण्यात आली होती. हा चित्रपट तुम्ही आजही ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.

Priya Bapat: प्रिया बापट आणि उमेश कामतच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ

अ पेईंग घोस्ट 

‘अ पेईंग घोस्ट’ या चित्रपटात कॉमेडी, रोमान्स आणि ट्रॅजेडी याचा मिलाफ पाहायला मिळाला होता. या चित्रपटात उमेश कामत आणि सृहा जोशी यांची जोडी मुख्य भूमिकेत होती. २०१५मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात अभिनेता पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री श्रावणी पिल्ले यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. एका लग्न झालेल्या जोडीच्या घरात जेव्हा एका भुताचे कुटुंब राहायला येते, तेव्हा काय धमाल उडते, यावर या चित्रपटाची कथा आधारित होती. हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

असेही एकदा व्हावे 

२०१८ मध्ये आलेल्या ‘असेही एकदा व्हावे’ या चित्रपटात उमेश कामतसोबत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात श्रावणी पिल्ले ही देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. ‘असेही एकदा व्हावे’ या चित्रपटाची कथा एक रोमँटिक प्रेम कहाणी होती. या चित्रपटातील गाणी भरपूर गाजली.

बाळकडू

‘बाळकडू’ या चित्रपटाच्या नावात चित्रपटाची संपूर्ण कथा कळते. शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात उमेश कामतने मुख्य भूमिका केली होती. तर, अभिनेता प्रसाद ओके आणि अभिनेत्री नेहा पेंडसे यांच्या देखील यात महत्त्वाच्या भूमिका होत्या. मराठी माणसासाठी बाळासाहेब यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या याच विचारांवर चालणाऱ्या एका शिक्षकाची कथा या चित्रपटात दाखवली गेली होती. 

Whats_app_banner