Viral Video : उदित नारायण यांनी श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांनाही केलेले किस! व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video : उदित नारायण यांनी श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांनाही केलेले किस! व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Viral Video : उदित नारायण यांनी श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांनाही केलेले किस! व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Feb 03, 2025 09:53 AM IST

Udit Narayan Viral Video : उदित नारायण यांनी एका चाहतीला किस केल्याचा वाद अद्याप शमलेला नाही. यातच आता त्यांचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

उदित नारायण यांनी श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांनाही केलेले किस!
उदित नारायण यांनी श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांनाही केलेले किस!

Udit Narayan Kissing Viral Video : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण सध्या एका व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमातील गायकाचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात तो एका महिला चाहतीच्या ओठांवर किस करताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर उदित यांनी आपल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देत आपल्याला कोणताही पश्चाताप झाला नसल्याचे सांगितले. उदितचा चुंबन वाद अजून संपलेला नव्हता की, त्यांचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उदित नारायण बॉलिवूडच्या दोन दिग्गज गायिकांना किस करताना दिसत आहेत, ज्यामुळे नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

उदित नारायण एका महिला चाहतीला किस करतानाच्या व्हिडिओनंतर आता उदित नारायणचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उदित श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक सारख्या दिग्गज गायिकांना किस करताना दिसत आहेत. या कृतीमुळे दोन्ही गायिका देखील आश्चर्यचकित झाल्या आहेत.

Viral Video : भर कार्यक्रमात सगळ्यांसमोर उदित नारायण यांनी केलं चाहतीला किस! व्हिडिओ पाहून बसेल धक्का

दिग्गज गायिकांना केलं किस!

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उदित नारायण स्टेजवर श्रेया घोषालला पुरस्कार देतात, तेव्हा अचानक तिच्या गालावर किस करतात. श्रेयाच्या व्हिडिओतील हावभावावरून हे स्पष्ट होते की, तिला या गोष्टीची अजिबात अपेक्षा नव्हती. दिग्गज गायकाच्या या कृतीने ती थोडी गोंधळूनच गेली होती. यानंतर उदितने अलका याज्ञिक यांच्यासोबत देखील नेमके तेच केले. उदित यांनी त्यांना देखील अचानक किस केले, ज्यामुळे त्यांना धक्का बसला.

नेटकरी संतापले!

उदित नारायण यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताच लोक त्यांना पुन्हा जोरदार ट्रोल करत आहेत. यावर कमेंट करत लोकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. एका युजरने लिहिलं, ‘उदित हाश्मी.’ तर एकाने लिहिले की, 'थरकी नारायण'. तिसरा युजरने कमेंटमध्ये लिहिलं, 'ट्रेंडमध्ये कसं राहायचं हे त्यांना माहित आहे.' एकाने तर असंही म्हटलं की, ‘काळासोबत चालतोय हा!’, यासोबतच ‘श्रेया स्पष्टपणे अस्वस्थ दिसत होती, पण तिने हसून परिस्थिती हाताळली’, ‘हे वर्तन योग्य नाही, श्रेया मॅडमला अस्वस्थ वाटले आणि त्यांचा हात ज्या पद्धतीने पकडला गेला ते देखील चुकीचे होते’, ‘उदित, हे थांबवा, हे योग्य नाही!’, अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.

Whats_app_banner