Udit Narayan Viral Kiss Video : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण हे इंडस्ट्रीतील दिग्गज गायकांपैकी एक आहेत. उदित यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम गाणी दिली आहेत, जी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूप आवडतात. मात्र, आता उदित नारायण यांचा नवा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांना खूप ट्रोल केले जात आहे. इतकंच नाही तर, हा व्हिडिओ पाहून चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उदित नारायण ‘टिप-टिप बरसा पाणी’ या गाण्यावर परफॉर्म करत आहे आणि तितक्यात अनेक महिला फॅन्स स्टेजजवळ येऊन त्यांच्यासोबत फोटो क्लिक करतात. यावेळी एक चाहती तिथे येऊन फोटो काढत असते आणि त्यावेळी गायक उदित नारायण तिला किस करतात. त्याचवेळी जेव्हा ही चाहती त्यांना गालावर किस करायला जाते, तेव्हा चुकून ओठांवर ही किस झाल्याचे दिसते. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला चाहतीही आश्चर्यचकित झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. एकाने कमेंट करत म्हटले आहे की, हा व्हिडिओ एआयने एडिट केलेला आहे. कुणी म्हणतंय की, ‘उदित नारायण... नाही, असं कसं होऊ शकतं? मी यावर विश्वास ठेवू शकत नाही’. तर, त्यांचे चाहते त्यांचा बचाव करत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर उदित नारायण किंवा त्यांच्या टीमकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. गायकाची कारकीर्द चार दशकांहून अधिक काळ चालली आहे. आपल्या आवाजाने त्यांनी लाखो हृदयात स्थान निर्माण केले आहे. नेपाळ रेडिओमधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती, जिथे ते मैथिली आणि नेपाळी गाणी गायचे. १९८० मध्ये त्यांनी ‘उन्नी-बीज’ या चित्रपटाद्वारे बॉलिवुड प्लेबॅक डेब्यू केला. या चित्रपटात त्यांना संगीत दिग्गज मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली. उदित यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, बंगाली, सिंधी, ओडिया, भोजपुरी, नेपाळी, मल्याळम आणि आसामी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. उदित यांना ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत.
आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर, यावर उदित नारायण काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. उदित नारायण क्वचितच वादात अडकताना दिसतात आणि आता त्यांचा हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
संबंधित बातम्या