अभिनेत्री ट्विंकल खन्ना सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. १९९० च्या दशकात तिने चित्रपटसृष्टीत काम केले, पण काही काळानंतर तिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला. नंतर ती एक होस्ट आणि लेखिका आहे. ट्विंकलचे वडील राजेश खन्ना यांनी अनेक दशके बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य केले आणि त्यांना सुपरस्टार ही उपाधी देण्यात आली. पण जेव्हा राजेश खन्ना आणि डिंपल यांचा घटस्फोट झाला तेव्हा त्याचा ट्विंकलवर परिणाम झाला होता.
डिंपल आणि राजेश खन्ना यांचे लग्न १९७० च्या दशकात झाले होते. राजेश खन्ना हे डिंपलपेक्षा वयाने खूप मोठे होते. हळूहळू त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही. १९८०च्या दशकात त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या सगळ्याचा ट्विंकल खन्नावर मोठा परिणाम झाला होता. २०१८मध्ये करण जोहरच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ट्विंकलने आई-वडील विभक्त होत असतानाची परिस्थिती सांगितली होती. या सगळ्यात डिंपल कशा सगळ्या गोष्टींचा सामना करत होत्या हे देखील तिने सांगितले.
'मी जे काही लिहिते ते महिलांशी संबंधीत असते. ज्या महिला या देशात स्वत:चे स्थान शोधत असतात त्या महिलांचा उल्लेख करते. या महिलांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते. एक महिला कशी असावी तिने कसे असायला हवे हे माझ्या डोक्यात कायम सुरु असते. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आजीकडे जायचो. आम्हा सगळ्यांना एक खोली दिली जायची. माझी आई आणि मावशी एका बेडवर झोपायच्या. मी आणि माझी बहिण जमिनवर झोपायचो' असे ट्विंकल म्हणाली.
पुढे ती म्हणाली, त्यावेळी तिच्या ३ शिफ्ट असायच्या. ती ९ वाजता यायची पण कधीच कोणी तक्रार नाही केली. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असायचा. त्यावेळी माझ्या डोक्यात इतकच सुरु होते की प्रत्येक महिलेला स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. पुरुष आयुष्यात असतील तर ठीक आहे. ते एका मिठाई सारखे असतात. ते कधीच मूळ जेवण होऊ शकत नाहीत. ट्विंकल म्हणाली की, तिचा अनुभव तिच्या संपूर्ण आयुष्याची व्याख्या सागंतो. कारण हा काळ तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. अंतरलेल्या गादीवरुन बेडवर झोपलेल्या आईकडे पाहिल्यावर ट्विंकलला आयु्ष्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.
वाचा: हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले
दुसऱ्या एका मुलाखतीत डिंपल यांनी सांगिते होते की, विभक्त झाल्यानंतर ट्विंकल त्यांची आई झाली. ती एक अप्रतिम मुलगी आहे. ट्विंकल ७-८ वर्षांची असताना डिंपलचा घटस्फोट झाला. तिला फक्त माझी काळजी घ्यायची होती आणि मी ठीक आहे की नाही हे तपासायचे होते. ती माझी मैत्रिण झाली आणि नंतर राक्षस आई बनली.