स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'प्रेमाची गोष्ट.' या मालिकेत सावनीच्या आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तरीही ती सागर आणि मुक्ताला कसे दूर करता येईल यासाठी प्लानिंग करत असते. गेल्या काही दिवसांपासून सावनीला या सर्व गोष्टींमध्ये यश मिळाले दिसत आहेत. सावनी सागरचे कान भरते आणि सागरला ते खरे वाटते. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया.
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सागर आणि मुक्ताच्या भांडणाने होणार आहे. सागरचा मुक्तावर प्रचंड राग असतो. त्याला मुक्ताकडे बघायचे देखील नसते. त्यामुळे जेव्हा तो बेडरुममध्ये जातो आणि कपाट उघडतो तेव्हा त्याला मुक्ताच्या साड्या समोर दिसतात. तो रागाच्या भरात त्या साड्या आणि कपडे फेकून देतो. तेवढ्यात मुक्ता तेथे. सागरने केलेला प्रताप पाहून ती चिडते. ते देखील रागाच्या भरात सागरचे सगळे कपाटातून काढते आणि फेकून दिसते.
सागरने कपाटातून काढून टाकलेले कपडे मुक्ता गोळा करते. ती एक बॅग घेते आणि त्या बॅगेत ते कपडे भरते. सई देखील सागर आणि मुक्ताचे भांडण ऐकते. ती त्यांना का भांडताय असे विचारत असते. तेवढ्यात मुक्ता तिला आपण आजीकडे राहायला जाऊया असे बोलते. बॅग उचलते आणि सईला घेऊन मुक्ता माहेरी निघून जाते. इंद्रा मुक्ताला का चालले विचारते. त्यावर मुक्ता असाच काही तरी बहाणा करते. त्यानंतर तेथून निघून जाते.
मुक्ता घरी जाऊन आईला सर्व काही सांगते. त्यावर माधवी मुक्ताला समजावते की मला आणि तुला माहिती आहे की तुझं व आशयचं काही नाही. कारण आशयला मी लहानपणापासून ओळखते. पण हे सागरला माहिती नाही. कारण त्याने तुम्हाला लहानपणी पाहिलेले नाही. तसेच सागरचा भूतकाळ हा अतिशय वेगळा होता आणि तुझा भूतकाळ हा वेगळा आहे. त्यामुळे तुलाच एकदा शांत बसून सागरच्या डोक्यात या गोष्टी घालाव्या लागतील.
वाचा: तू हॉटेलमध्येच गाणे गा; अरिजीत सिंहची नक्कल करणाऱ्या स्पर्धकावर संतापला विशाल दादलानी
सागरची एक मैत्रिण त्याला भेटायला आलेली असते. ती सागरला मिठी मारते. मुक्ता गपचूप त्यांचे फोटो काढते. त्यानंतर घरी येऊन सर्वांसमोर सागर एका मुलीला मिठी मारत होते असे सांगते आणि रडायचे नाटक करते. तेव्हा सागर सांगतात ती तर माझी फक्त मैत्रिण आहे. तेव्हा सागरला त्याच्या चुकीची जाणीव होतो. तो पश्चाताप होतो. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या