छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आणि शाहनवाज नवाजुद्दीन सिद्दीकी नुकतेच एका मुलाचे आई-वडील झाले आहेत. देवोलीनाने अद्याप आपल्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. नुकताच देवोलीनाने सोशल मीडियावर बाळाच्या बारश्याचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच तिने लेकाचे नाव काय ठेवले याविषयी देखील माहिती दिली आहे.
देवोलीनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती आणि मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वोलीना बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे. कपाळाला चंदनाचा टीका दिसत आहे. फोटोमध्ये तिने मुलाचा चेहरा लपवला आहे. तसेच तिच्या शेजारी तिचा पती शाहनवाज असल्याचे दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे.
देवोलीनाने सोशल मीडियावर मुलाचा फोटो शेअर करत, 'या नव्या सदस्याचे कुटुंबात स्वागत करताना आम्ही आनंदी आहोत. आमच्या आनंदाचा खजिना असलेल्या जॉयला भेटा.' अभिनेत्री दीपिका सिंगने देवोलीनाच्या पोस्टवर हार्ट इमोजी बनवले आहेत. त्याचे अनेक चाहते मुलाला आशीर्वाद देत आहेत.
वाचा: शाहरुख खानच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, इतक्या किंमतीत येईल मुंबईत घर
देवोलीनाने २०२२ मध्ये शाहनवाज शेखसोबत लग्न केले होते. शाहनवाज हा देवोचा जिम ट्रेनर होता. देवोने सांगितले होते की, महामारीच्या काळात तिला जाणवले की ती शाहनवाजच्या किती जवळ आहे आणि त्याच्यासोबत आयुष्य घालवू इच्छिते. देवोलीनाने आणि शाहनवाजचे फोटो कायम सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. डिसेंबरमध्ये ते दोघे एका मुलाचे आई-बाबा झाले. देवोने मुलाचे नाव जॉय ठेवले आहे ज्याचा अर्थ आनंद असा होतो. हे नाव बहुतेक बंगाली कुटुंबांमध्ये ठेवले जाते. या शब्दायचा संबंध विजयाशी जोडला जातो.
संबंधित बातम्या